विद्यापीठात दहशतीचे वातावरण ; सीसीटीव्ही बसवा - डॉ. प्रकाश इंगळे यांची मागणी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यापीठात दहशतीचे वातावरण ; सीसीटीव्ही बसवा - डॉ. प्रकाश इंगळे यांची मागणी


छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी -  विद्यापीठात गेल्या दोन महिन्यापासून विविध घटना घडत आहेत. यामधून विद्यापीठाची प्रतिमा मलीन होताना दिसत आहे. हे एक चळवळीचे केंद्र आहे. त्याची गरिमा राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, म्हणून विद्यापिठात तत्काळ हाय रेग्युलेशन कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी सम्यक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश इंगळे यांनी आज (14 फेब्रु.) रोजी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना दिले. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. वाल्मिक सरोदे उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी एका बुलेटवर दोन मुले येऊन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. आज 20 ते 25 मुले भगवे कपडे तोंडाला लावून विद्यापीठ परिसरात दहशत पसरण्याचे प्रयत्न केला गेला. यामुळे विद्यापीठांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. तरी विद्यापीठातले काही ठिकाणी कॅमेरा बसवलेले आले आहे पण त्यामध्ये स्पष्ट व्हिडिओ दिसत नाही आणि काही ठिकाणी कॅमेरे नाहीत म्हणून विद्यापीठातील विविध ठिकाणी हे AUTOMATIC NUMBER PLATE RECOGNITION (ANPR) कॅमेरे बसवावे. जेणेकरून कोण येते आणि कुठे जाते हे स्पष्ट दिसेल. आणि यामधून पारदशर्कता निर्माण होईल. यामुळे कोणी भीतीपोटी दहशत माजवण्याचा प्रयत्न करणार नाही. कुलगुरू महोदयांना विनंती आहे की अशा प्रकारचे कृत्ये विद्यापीठात होऊ नये म्हणून.आपण जे कोणी आज दहशत माजविण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. विद्यापीठ परिसरात कॅमेरे बसवण्यात यावे अन्यथा 15 दिवसात भव्य आंदोलन करण्याचा इशारा डॉ. इंगळे यांनी दिला आहे. 

निवेदनावर प्रविण इंगळे, गोलू गवई वाल्मिकी वाघ, अविनाश सावंत,अन्नासाहेब सोनवणे, नितीन हजारे,अनिल दीपके, हर्षपाल खाडे, हर्षवर्धन कांबळे, गजानन प्रधान, सतिष कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या