सावित्रीबाईंनी महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे बल दिले. - प्रा.श्रीकृष्ण बनसोड

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाईंनी महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे बल दिले. - प्रा.श्रीकृष्ण बनसोड

अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांच्या क्रांतिज्योती / वंदनगीताने झाला कार्यक्रमाचा समारोप.


अमरावती (प्रतिनिधी) - "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतीय महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले.महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरणासाठी संघर्ष केला. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्रांती कार्य हे सर्वांना प्रेरणादायी असून शूद्रांना प्लेगच्या साथीतून वाचवितांना त्यांचे झालेले महानिर्वाण हे सकलांना दीपस्तंभासम प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी केले. 

स्थानिक सर्वशाखीय माळी महासंघ, उपेक्षित समाज महासंघ, माळी मिशन, सकल ओबीसी समाज व सावता व्यायाम व क्रीडा मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून दि . १० मार्च २०२४ रोजी सावता सभागृह, रामनगर अमरावती येथे प्रबोधनपर व्याख्यान, एकपात्री नाट्य प्रयोग व वंचित महिला कामगार तसेच कर्तृत्ववान सावित्रीच्या ५० लेकींचा सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


लेखक-कवी-वक्ता-अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी स्वरचित " निखारा " या काव्यसंग्रहातील;" क्रांतिज्योती " हे वंदनगीत व अभंग सुमधूर सुरामध्ये गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि  " क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकार्य समजून घेणे काळाची गरज आहे.

सावित्रीबाई फुले आपल्या काव्य फुलांमध्ये म्हणतात की, 

 "अभ्यास करी विद्येचा ॥ विद्येस देव मानून ॥ घे नेटाने तिचा लाभ ॥ मनी एकाग्र होऊन ॥" आज विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या या अभ्यास विषयक तत्वज्ञानाला आचरणात आणले तर प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानवंत -गुणवंत होईल." असे विचार व्यक्त केले.


यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्षा प्रा.डॉ. उज्ज्वला सुरेश मेहरे (माळोदे) यांची डॉ.आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.



 स्वागताध्यक्ष इंजि. वासुदेवराव चौधरी यांनी " ओबीसी प्रवर्गातील सर्वच जातींच्या संघटन बांधणीची तसेच सावित्रीबाई फुले यांनी वंचित महिलांना आधार दिला. त्यांचे कार्य गतीशील करण्याची गरज व्यक्त केली."


यावेळी श्री. रत्नाकर सिरसाट लिखित व दिग्दर्शित" मी सत्यशोधक ज्योतिबा फुले बोलतोय " ह्या एकपात्री नाट्यप्रयोगाचे ज्येष्ठ रंगकर्मी श्री. सुशिलदत्त यांनी म . फुलेंचा वेश परिधा करून बहारदार सादरीकरण करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले



याप्रसंगी डॉ.निलीमा उमप, सौ.नंदा गोपाल मालपे, सविता खोडस्कर (सरपंच) सुशीला चौधरी, प्राचार्या मंदाताई निमकर, कविता पाचघरे, जिल्हाध्यक्षा स्मिता संजय घाटोळ, सुनिता इथापे, माजी नगरसेविका सौ.नूतन भुजाडे आदि प्रमुख अतिथी होत्या. अध्यक्षीय भाषणातून प्रा. डॉ. उज्वला मेहरे (माळोदे) यांनी म. फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.


दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या वंचित महिला घरेलू कामगार,आश्विनी गाडेकर, वनिता जंगले,उषा वडेकर, शशिकीरण पाळोदे, निर्मला नांदुरकर,आशा अपाले बानूबेन चौधरी,मिना लांजेकर, सुषमा वैराळे,रेखा भालेराव,सुनंदा डोंगरे,गंगा मेश्राम व शोभा पापळकर आदिंचा साडी चोळी व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तथा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व महिलांचे संघटन बांधणीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कर्तबगार सावित्रीच्या लेकींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये जयश्री नागपुरे, सविता डाहे, वैशाली पिहूलकर, सुचिता सातपुते, शिला मेश्राम, राजकन्या मालखेडे, वैशाली गुळसुंदरे, रंजना सागर,ज्योती सैरिसे,सिमा साखरे,सविता वरणकर,प्रियंका राऊत,अर्चना खांडेकर,सिमा डुकरे,वंदना घुगे, माला ढाकणे,रिता मोकलकर, ललित पेढेकर,संगीता साव,प्रेमा लव्हाळे,उषा बाहेकर,प्रभा भागवत, ज्योती बाविस्कर, अनुष्का बेलोरकर,शोभा नवलकर, वंदना जामनेकर, देवयानी कुर्वे,शोभा पाचकवडे,भूमिका सायगण, अनिता तिखिले,किरण गुलवाडे, निलीमा अंजीकर,मधुरा काहाळे,  रजनी आमले, कीर्ती म्हस्कर, शारदा लसनकार, ऑड. अक्षरा लांडे आदिंचा समावेश होता.


" वऱ्हाड विकास "च्या विशेष अंकाचे इंजि.वासुदेव चौधरी, प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रा.अरुण बुंदेले,श्रीकृष्णदास माहोरे,ओमप्रकाश अंबाडकर, इंजि. सुभाषा गोहत्रे, इंजि. प्रकाश खंडारे ,अँड. प्रभाकर वानखडे, इंजि. सुभाष गोहत्रे, इंजि. प्रकाश खंडारे, आदि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .


 सर्वश्री वसंतराव भडके,डॉ. श्रीराम कोल्हे, कमलाकर घोंगडे, प्रा. एन. आर. होले, डॉ. विजय भोजने , ॲड .आशीष लांडे, सचिन खवले, सुधाकर विरुळकर, शांताराम होले, इंजि. केशवराव झाडे, सुरेश मेहरे, प्रा. सुरेश नांदुरकर,माजी नगरसेविका अलका सरदार, सौ. नंदा बनसोड, सौ. कल्पना होले, सौ. पुष्पा निमकर, सौ. सिंधु भडके, सौ. सरिता चर्जन, सौ. मैथिली पाटील, प्रा. डॉ. शिला लोखंडे, डी. एस. यावतकर, मधुकर आखरे, रामकुमार खैरे, सुधीर घुमटकर, प्रा. निलीमा बोरोडे, इंजि. अरुण कांडलकर, सुखदेवराव चर्जन, समित भडके, नरेंद्र वानखडे, सौ. शालीनी मांडवधरे, गजानन आजनकर, प्रभुदास खलोकार, प्रा. प्रकाश तडस, प्रा. शरद वन्हेकर, प्रा. प्रदीप शेवतकर सह सर्वशाखीय माळी महासंघ, उपेक्षित समाज महासंघ, माळी मिशन, सकल ओबीसी समाजचे पदाधिकारी तसेच फुले- शाहू-आंबेडकरांचे अनेक अनुयायी उपस्थित होते. 


सूत्रसंचालन - स्मिता संजय घाटोळ यांनी तर सौ. सुशीला वासुदेव चौधरी यांनी  आभार प्रदर्शन केले. यावेळी स्व. शंकररावजी बोरोडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या