'भिमोत्सव' पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी प्रा. समाधान दहिवाळ यांची निवड

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

'भिमोत्सव' पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी प्रा. समाधान दहिवाळ यांची निवड

समतेचे युवा पर्व "भिमोत्सव - २०२४" पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी प्रा. समाधान दहिवाड यांची निवड करण्यात आली आसल्याचे भिमोत्सव समितीचे मुख्य निमंत्रक डॉ. प्रकाश इंगळे यांनी 'सोशल 24 नेटवर्क'शी बोलताना दिली.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थी समितीच्या वतीने प्रतिवर्षी भीम उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी भीमोत्सव आयोजन मोठ्या थाटामाटात आणि नियोजन पद्धतीने करण्याचा संयोजन समितीचा विचार आहे. या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील आंबेडकरवादी विद्रोही कवी समाधान दहिवाळ यांची निवड करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून नितीन हजारे ,एडवोकेट नागसेन वानखेडे, सीमा कदम,सुयश नेत्रगावकर ही मंडळी काम करणार आहेत. 


2024 मध्ये पुढील पुरस्कारासाठी 20 मार्च 2024 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, लोकनेते भैय्यासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, शैक्षणिक क्रांती पुरस्कार, महाकवी वामनदादा कर्डक गायन पुरस्कार, महात्मा ज्योतिराव फुले युवा उद्योजक पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार प्राध्यापक अविनाश डोळस फुले आंबेडकर कार्यकर्ता पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संशोधक पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार सदरील पुरस्कारासाठी प्रस्ताव 20 मार्च 2024 पर्यंत पाठवायचे आहेत. 


पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविताना आपला एक अर्ज, एक बायोडाटा, दोन पासपोर्ट साईज फोटो आणि साहित्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवताना ग्रंथाच्या तीन प्रती पाठविणे आवश्यक आहे सदरील प्रस्ताव पुढील पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या