"सीट शेअरिंग"बाबत आंबेडकरांचे थेट कॉंग्रेसला साकडे?

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

"सीट शेअरिंग"बाबत आंबेडकरांचे थेट कॉंग्रेसला साकडे?

 


अकोला/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील लोकसभेच्या वाटाघाटीसंदर्भातील चर्चा पुढे सरकत नसल्याने अखेर अॅड. आंबेडकरांनी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नाथला यांच्याशी  संपर्क साधत महाविकास आघाडीत झालेल्या वाटाघाटीची यादी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. 

महाविकास आघाडीच्या वतीने कॉंग्रेसला मिळालेल्या जागांची यादी मागतांनाच आंबेडकरांनी आपण एकत्र बसुन आपल्यापुरता निर्णय घेवू, असेही नमूद केले आहे. यासंदर्भात कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती आज अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. आंबेडकरांनी दिली.

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यावर अद्यापही महाविकास आघाडीची स्पष्ट भुमिका नाही. आघाडीमध्ये 15 मतदार संघांच्या जागेवरून वाद आहेत. त्यामुळे आयोजित बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा होत नसल्याचेही आंबेडकर म्हणाले.

त्यामुळे आता कॉंग्रेस आणि वंचित अशी आघाडी तयार होण्याची शक्यता वर्तवली जात असून यावर कॉंग्रेस काय प्रतिसाद देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या