...तर इंग्रज राजवटीसारखी परिस्थिती निर्माण होईल ; अॅड. आंबेडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

...तर इंग्रज राजवटीसारखी परिस्थिती निर्माण होईल ; अॅड. आंबेडकर

 


अकोला/प्रतिनिधी - ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातुन इंग्रजांनी भारतात बॅकडोअर पार रोवले व भारतात हुकुमशाही प्रस्तापित केली त्याच पद्धतीने भाजपाचे 400 खासदार निवडुन आल्यास संविधान बदलले जाईल व पुन्हा एकदा मनुस्मृती लागू केली जाईल, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. 

आज (दि. 11 मार्च रोजी) अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना अॅड. आंबेडकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अनंत हेगडे यांनी नुकतीच पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही, असे विधान केले आहे. या विधानाला संविधानवाद्यांनी गांभिर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा इंग्रज राजवटीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या