छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी आंबेडकरी महिला चळवळीचे मुखपत्र मासिक रमाईच्या संपादक राजर्षी शाहू महाविदयालय पाथ्री ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर येथील मराठी विभागप्रमुख डॉ. रेखा मेश्राम लिखित ‘आंबेडकरी स्त्रीवाद वैचारिक समीक्षा’ या ग्रंथास ‘सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार’ जाहिर नुकताच जाहिर करण्यात आला आहे.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दि. ३१ मार्च रोजी नागपूर येथे आयोजित विशेष समारंभात डॉ. प्रा. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्र महामंडळाकडून त्यांना नुकतेच पाठविण्यात आले आहे.
डॉ. रेखा मेश्राम या फुले-आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्त्या म्हणुन महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांची अव्यक्त मनाचा हुंकार, कविता रमाईची, धम्मक्रांतीचा सुवर्णमहोत्सव आणि आम्ही, मांग-महारांच्या दुःखाविषयी निबंध, रमाई चळवळीचे साहित्य संमेलनाची अध्यक्षीय भाषणे, दलित कवयित्रींच्या कवितेतील आंबेडकरी स्त्रीवाद अशी विपूल ग्रंथसंपदा प्रसिद्ध असून अनेक महत्वपूर्ण ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे. रमाई फाउंडेशनच्या माध्यमातुन फुले-आंबेडकरी महिला चळवळ बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी आतापर्यंत 11 ‘रमाई महिला चळवळीची’ साहित्य संमेलने भरवली आहेत. यासह विविध उपक्रम त्या सातत्याने राबवित असतात. या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या