11 व्या रमाई महिला चळवळीच्या साहित्य संमेनाध्यक्षपदी माया दामोदर यांची निवड

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

11 व्या रमाई महिला चळवळीच्या साहित्य संमेनाध्यक्षपदी माया दामोदर यांची निवड


छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - रमाई फाउंडेशन, रमाई मासिक, रमाई प्रकाशन व लोकनेते भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, औरंगाबाद आयोजित 11 व्या रमाई महिला चळवळीच्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व सुप्रसिद्ध लेखिका माया दामोदर यांची नुकतीच निवड करण्यात आली असल्याची माहिती रमाई फाउंडेशनच्या अध्यक्षा, रमाई मासिकाच्या संपादक तथा साहित्य संमेलनाच्या मुख्य संयोजक प्रा. डॉ. रेखा मेश्राम दिली.



सदरील संमेलन दि. 27 मे 2024 रोजी (रमाई स्मृतिदिनी) शेगाव जि. बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. माया दामोदर यांचे 22 कविता संग्रह, 7 वैचारिक लेखनपर पुस्तके, 5 कादंबरी आणि 4 कथा संग्रह यासह एकुण 41 पुस्तके त्यांची प्रसिद्ध असून अनेक पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.  आंबेडकरी महिला साहित्य चळवळीमध्ये त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.


यापूर्वी झालेल्या 10 साहित्य संमेलनामध्ये पहिले संमेलन अकोला येथे संपन्न झाले होते. त्याच्या अध्यक्षा प्रा. डॉ. विमल थोरात या होत्या. औरंगाबाद येथे झालेल्या दुसऱ्या संमेलनाध्या हिरा बनसोडे या होत्या. मुंबई येथे झालेल्या तिसऱ्या संमेलनाच्या अध्यक्षा उर्मिला पवार या होत्या. रमाईच्या माहेरी वणंद येथे झालेल्या चौथ्या संमेलनाध्या आशालता कांबळे या होत्या. पाचवे संमेलन नासिक येथे संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष म्हणुन अरूणा लोखंडे या होत्या. सहावे संमेलन नागपुर येथे झाले असून संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. सुशिला मूल-जाधव या होत्या. सातवे संमेलन सोलापूर येथे व अध्यक्ष हिरा दया पवार या होत्या. अमरावती येथे झालेल्या आठव्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. निशा शेंडे या होत्या. वाशिम येथिल नवव्या साहित्य संमेलनाध्या कवयित्री उषा अंभोरे या होत्या. अहमदनगर येथे झालेल्या दहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तृतियपंथी समूहाच्या प्रतिनिधी दिशा पिंकी शेख यांनी भुषवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या