अमरावती जिल्हयातील आंबेडकरी/बौद्ध समुहाला सावधानतेचे आवाहन करणारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांचा लेख...
आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या समस्त कार्यकर्त्यांना आणि बौद्ध समूहातील समस्त माझ्या बौद्ध बांधवांना क्रांतीकारी जय भिम.
वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक, राजकीय चळवळीचे आपण गेल्या अनेक वर्षांपासून सारथ्य करत आहोतच, अनेक खाचखडग्यांतून ताकदीने उभे राहत आपण श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली वंचितांच्या स्वाभिमानाची लढाई लढत आहोत. आणि या लढाईत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी या राज्यातील बौद्ध समूहासह ओबीसी, मायक्रो ओबीसी, मुस्लिम समूह मोठ्या ताकदीने उभा राहिल्याचे आपण अनेकदा बघितले आहे.
जाती धर्माच्या समूह संख्येचा विचार न करता समाजातील शेवटचा घटक सामाजिक, राजकीय प्रवाहात आला पाहिजे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे प्रभावित होऊन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करून सुद्धा वंचितांचा सामाजिक लढा मजबूत करण्याच्या उद्देशाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ताकदीने उभे असणारे वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. निलेशभाऊ विश्वकर्मा आहेत. अमरावती जिल्हयात वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक, राजकीय चळवळीमध्ये आपल्या तडफदार व्यक्तिमत्वातून ऊर्जा निर्माण करण्याचे काम डॉ. निलेशभाऊ विश्वकर्मा करत आहेत. आज अमरावती जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक लागली आहे, अनेक मतमतांतरे सुरू आहेत; परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आदेश हाच अध्यादेश मानून कुठलीही जबाबदारी पार पाडण्याची तयारी डॉ. निलेशभाऊ विश्वकर्मा यांची असते. त्याच भूमिकेतून आज लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात ते भूमिका बजावत आहेत. बौद्ध आणि बहुजन समूहाच्या सामाजिक, राजकिय न्याय-हक्काच्या लढाईत एक मायक्रो ओबीसी घटकातून समोर आलेला युवा नेता आमचं नेतृत्व करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु बौद्ध समूहाच्या मतांची विभागणी व्हावी व वंचितकडे जाणारा वर्ग गोंधळून जावा या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी विरोधात व डॉ. निलेशभाऊ विश्वकर्मा यांचे विरोधात भ्रम निर्माण करण्यासाठी काही जण सोशल मीडियावर आपली विद्वत्ता पाजळवत आहेत.
मित्रहो, कधी नव्हे ते अमरावती जिल्हयात वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद निर्माण झाली आहे आणि हेच प्रस्थापित पक्षांना नको आहे. ज्या प्रस्थापित पक्षाना त्यांचे दुकान बंद होण्याची भीती वाटत आहे त्यामुळे आता त्यांच्या कडून वारंवार वंचित बहुजन आघाडी विरोधात, बौद्धांना भ्रमित करण्यासाठी ओबीसी समूहातील युवा नेते डॉ. निलेशभाऊ विश्वकर्मा यांचे विरोधात पोस्ट येतील. मित्रहो, हा प्रस्थापितांचा डाव आपण ओळखला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे भ्रमित न होता सावध झाले पाहिजे. अनेक समस्यांचा सामना करून ही अमरावती लोकसभेची लढाई समर्थपणे लढून आपणाला श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविलेल्या युवा सुशिक्षित उमेदवार कु. प्राजक्ताताई पिल्लेवान यांना विजयी करून वंचित समूहाचा आवाज बुलंद करायचा आहे. तेव्हा प्रस्थापितांच्या पगारी वाँर रूम मधून येणाऱ्या विरोधी पोस्टमुळे आपण भ्रमित न होता या जिंकत असलेल्या वंचितांच्या लढाईचे सैनिक व्हावे, हेच समस्त बौद्ध समूहाला आवाहन...
सागर भवते
जिल्हा महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती
0 टिप्पण्या