छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी : स्थानिक साहित्यधारा बहुउद्धेशिय सेवाभावी संस्थेच्यावतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २०८६ व्या जयंती निमित्त "चलो बुद्ध की ओर" राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रा.शिलवंत गोपणारायन यांना "फुले शाहू आंबेडकर या पुरस्कार - २०२४" जाहीर करण्यात आला असल्याचे पत्र संयोजन समितीच्यावतीने डॉ. संघर्ष साळवे यांनी. नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
प्रा. गोपनारायण गेली अनेक वर्षापासून बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या विचारांचा वारसा घेऊन सतत सामाजिक कार्यात काम करीत आहेत. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक, शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी लढा दिला आहे.
या संपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार त्यांना एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे ५ मे २०२४ रोजी आयोजित कार्यक्रमातून सन्मानजनक प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या