विद्यापीठात भीमोत्सवाला आजपासून सुरुवात

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यापीठात भीमोत्सवाला आजपासून सुरुवात

छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त समतेचे युवापर्व भीमोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे १२ वे वर्ष आहे. शुक्रवार दि. ५ एप्रिल ते १० एप्रिल २०२४ या दरम्यान होत असलेल्या या महोत्सवात  डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा सांस्कृतिक आणि वैचारिक जागर करण्यात येणार आहे.  उद्घाटक म्हणून जेष्ठ विचारवंत आंबेडकरी विचारवंत प्रोफेसर डॉ.दिलीप चव्हाण असून अध्यक्षस्थानी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी असणार आहेत, प्रमुख पाहुणे डॉ. वाल्मिक सरोदे,डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. कैलास अंभुरे व अनिलकुमार बस्ते असणार आहेत. 



या महोत्सवात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून गौरवीण्यात येणार आहे, तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर,विद्यापीठ आयडॉल, आंबेडकरी विद्रोही कवी संमेलन, नाट्य महोत्सव व राज्यस्तरीय सोलो डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहेत, यासर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य निमंत्रक डॉ. प्रकाश इंगळे व मंगेश गवई यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या