छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवी व पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दि. 5 एप्रिल ते 10 एप्रिल 2024 दरम्यान विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात भीमोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मंगेश गवई यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती भीमोत्सवाचे मुख्य निमंत्रक डॉ. प्रकाश इंगळे यांनी दिली.
जाहिर करण्यात आलेली कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी दिग्विजय शिंदे, सिद्धार्थ गायकवाड, हर्षवर्धन कांबळे, रमेश कळंबे, विशाल आठवले, अनिल वाघ सरचिटणीसपदी सूरज दाभाडे, सुयश नेत्रगावकर, तुकाराम खिल्लारे, अक्षय देहाडे, विकास तुरेराव, डॉ. किरण जगताप कार्याध्यक्षपदी रोहित जोगदंड, रविंद्र गवई, नितीन हजारे, किशोर कांबळे सचिवपदी नालंदा वाकोडे, अमोल किरवले, किशोर कांबळे, अजय गायकवाड, प्रकाश उजगरे तर समिती समन्वयकदी गजानन गवई, नितीन फंदे, अण्णासाहेब सोनवणे, वाल्मिक वाघ कोषाध्यक्षपदी डॉ. विशाल वाघ, अॅड. प्रकाश वालेकर, सिद्धार्थ कांबळे, विजय धनगर, रामेश्वर कबाडे पाटील प्रसिद्धी प्रमुख म्हणुन अमरदीप वानखडे, रवी इंगळे, सुनिल इंगळे, सागर धोडपकर, विनोद अघाव, सचिन शिंदे, रामनाथ गायकवाड आदींची निवड करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या