समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या निर्मितीमध्ये फुले-आंबेडकरी चळवळीचे महत्वाचे योगदान ; कुलगुरू डॉ. विजय फुलारी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या निर्मितीमध्ये फुले-आंबेडकरी चळवळीचे महत्वाचे योगदान ; कुलगुरू डॉ. विजय फुलारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आयोजित समतेचे युवा पर्व भिमोत्सव - २०२४ च्या अध्यक्षीय भाषणातुन कुलगुरू डॉ. विजय फुलारी बोलत होते.



छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - या देशामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व अबाधित राहावे, लोकशाहीला बळकटी मिळावी या करिता फुले-आंबेडकरी चळवळीने सातत्याने पुढाकार घेऊन समताधिष्ठित समाज व्यवस्थेच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावली असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी केले.



ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आयोजित समतेचे युवा पर्व भिमोत्सव - २०२४ च्या अध्यक्षीय भाषणातुन बोलत होते.

यावेळी प्रकुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे, प्र कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, उदघाटक  आंबेडकरी विचारवंत प्रा. दिलीप चव्हाण, अधिसभा सदस्य डॉ. हरिदास सोमवंशी, प्रा. भारत सिरसाट, भीमोत्सवाचे मुख्य निमंत्रक प्रा.प्रकाश दादाराव इंगळे, अध्यक्ष मंगेश गवई आदी उपस्थित होते.



पुढे बोलताना डॉ. फुलारी यांनी मूकनायक चालवीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या मदतीचा दाखला दिला.प्रकुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली लोकशाही आणि संविधान टिकवून ठेवण्यासाठी डिकास्ट होणे गरजेचे आहे. जातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक परिवर्तनाचा लढा आपण बळकट केला पाहिजे.

प्रास्ताविकामध्ये डॉ. प्रकाश इंगळे यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षापासून हा महोत्सव आम्ही सर्व संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहकार्याने अविरत चालवीत आहोत. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा वारसा या विद्यापीठात या उपक्रमाद्वारे पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी समितीचे अध्यक्ष मंगेश गवई यांनी एकूण कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. त्यानंतर डॉ. प्रशांत अमृतकर, हरिदास सोमवंशी, डॉ. दिलीप चव्हाण आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एड. नागसेन वानखडे यांनी केले तर आभार अमरदीप वानखडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या