औरंगाबाद/प्रतिनिधी - सामाजिक समता संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अफसर खान यांना आज (दि. 30 एप्रिल) जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.
यासंदर्भात आज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी संजय चिकने, निवृत्ती गायकवाड, अजीज खान दौलत खान तंबाखूवाले, ऍड. महेंद्रकुमार रंगारी, गफूर तडवी, मधुकर मधाळे, सुनील जाधव, रवींद्र त्रिभुवन, प्रदीप मिसाळ, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या