बुद्धविचार आचरणातुनच शांतता प्रस्तापित होईल ; अॅड. पंकज बनसोडे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बुद्धविचार आचरणातुनच शांतता प्रस्तापित होईल ; अॅड. पंकज बनसोडे


छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - समता आणि शांतता प्रस्तापित करण्यासाठी तथागत भगवान बुद्धांचे विचार अंगिकारून प्रत्येकाने ते आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मानवता रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पंकज बनसोडे यांनी केले. 

ते आज (दि. 23 मे रोजी) तथागत भ. गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त स्थानिक ओरियन बिल्डिंग, जय टावर कोकणवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमातुन बोलत होते. 

पुढे बोलतांना अॅड. बनसोडे म्हणाले की, सत्य शोधण्यासाठी राजपुत्र असलेला सिद्धार्थ हा एकटाच घराबाहेर पडला होता. बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांनी संपुर्ण आयुष्य पायी प्रवास करून आपला विचार संपूर्ण जंबुदिपामध्ये पेरण्याचे काम केले. या दोन्ही घटना अत्यंत महत्वाच्या आहेत. आज 2500 वर्षापर्यंत बुद्धाचा विचार जिवंत आहे आणि पुढेही हजारो वर्ष तो जिवंत राहील. हा खर्या अर्थाने त्यांचा विचारांचा विजय आहे. आपण सर्वांनी आजच्या दिवशी आपल्या बुद्धीला जागृत करून समताधिष्ठित समाज व्यवस्थेच्या निर्मितीमध्ये आपले योगदान देण्याची गरज आहे. 

आजघडीला देशामध्ये अत्यंत अराजकता माजली असून धर्मांध प्रवृत्ती राजसत्ता हस्तगत करू पाहते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर लोकशाही वाचविण्याची मोठी जबाबदारी आहे. आपण आपल्या बुद्धीला चालना देवून, जागृत करून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाच्या राज्याची निर्मिती करण्यासाठी लढा उभारला पाहिजे. सर्व सामान्य जनतेला, वंचित बहुजनांना या सर्व प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून लोकशाहीच्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला दिशा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यांनी केले तर आभार सागर धोडपकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या