११ वे रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
शेगाव/प्रतिनिधी - लोकशाही बळकट करण्यासाठी विविध स्तरांतून सर्वांग पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता असून साहित्यिक-विचारवंतांनी सामाजिक परिवर्तनासाठी लेखन केले पाहिजे. सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय राजकीय क्रांती घडून येणे शक्य नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री, साहित्यिका तसेच ११ व्या रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माया दामोदर यांनी केले.
त्या आज (२७ मे) स्थानिक वर्धमान भवन (जिजाऊ नागरी) येथे आयोजित ११ वे रमाई चळवळीचे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून बोलत होत्या.
यावेळी संमेलनाच्या उदघाटक डॉ. विजयालक्ष्मी वानखडे, स्वागताध्यक्ष भाऊ भोजने, संमेलनाच्या मुख्य संयोजक प्रा. डॉ. रेखा मेश्राम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक डॉ. राजकुमार सोनेकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखा सवंग, जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ भोजने, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष न. ल. खंडारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. रेखा मेश्राम म्हणाल्या की, फुले-आंबेडकरी चळवळीत महिला साहित्यिकांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे परंतु त्याला कायम बाजूला सारण्याचे पद्धतशीर प्रयत्न होताना दिसतात. महिलांनी निर्माण केलेल्या साहित्याची व्यापक स्वरूपाची चर्चा, मांडणी करण्याची संधी गेल्या १० वर्षांपासून रमाईच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत.
ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. संजय मुन यांच्या अध्यक्षतेखाली चळवळीतील विचारवंतांची राजकीय प्रगल्भता किती? या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. सहभागी वक्ते म्हणून प्रा. राजकुमार सोनेकर, भास्कर भोजने, डॉ. मनोहर नाईक, डॉ. वसंत डोंगरे आदी उपस्थित होते.
त्यानंतर भारतीय स्त्रीवाद : जिजाऊ, ताराबाई शिंदे, सावित्रीमाई फुले या विषयावर डॉ. अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद संपन्न झाला. वक्ते म्हणून प्रवीण कांबळे, सुषमा पाखरे, संजय डोंगरे, कैलास वानखडे, डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा रमाई गौरव पुरस्काने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये स्नेहा जावळे (मुंबई), पार्वता इंगळे (जळगाव जामोद), संगिता ससाणे (शेगाव) इंदुबाई वानखेडे (लोखंडा), वनिता गायकवाड (नांदुरा), निता गवई (जि.प. सदस्य, बोरगाव मंजू), माया नाईक (सभापती, जि.प. मुर्तिजापूर), अॅड. पूजा दामोदर (शेगाव), अलका डोहाणे (औरंगाबाद), हेमलता शिराळे (सरपंच, कोठारी), सुमन थाटे (खामगाव), उर्मिला भीमराव तायडे (नांदुरा), कुमूदिनी मधाळे (कोल्हापूर), नंदा शेजवळ (दहिसर), सुनंदा रामटेके (उल्हासनगर), विमल शेंडे (नांदेड), जयश्री भगत (वर्धा), रत्ना मनवर (अमरावती), सरिता सातारडे (नागपूर), डॉ. सुजाता तायडे, (शेगाव), पुष्पा कांबळे (बुलडाणा) छाया बांगर (नांदुरा) आदींचा समावेश आहे.
ज्येष्ठ कवयित्री सुरेखा भगत यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले. त्यामध्ये कल्पना वाहुळे, लता इंगळे, रत्नकला बनसोड, सुनिता इंगळे, शीला जाधव, सुनंदा नागदिवे, जयश्री सरवदे, रजनी फुलझेले, शीला आठवले, प्रा. सुनिता अवचार, उज्वला देबाजे-मोरे, मधुराणी बनसोड, संध्या अडागळे, अलका धनगर, अहिल्या रंगारी, दिपाली दीप, सरीता रामटेके, स्वाती चनकापुरे, सुनिता घोडगे, योगिता वानखडे, ज्योती पंडित, डॉ. . सुनंदा जुलमे, माया दामोदर, डॉ. सुनंदा रामटेके, सुलभाश्री सिरसाट, माया कांबळे, मिना पाटील, सुषमा पाखरे, लता जुंबडे, सुरेखा कांबळे, माला मेश्राम, आम्रपाली रतनशील, जयश्री ढाकरगे, नलिनी मोकळे, नंदा शेजवळ, कविता थोरात, संजीवनी राजगुरू, लता पडघान, वनिता गावंडे, सरीता सातारडे, आशा डांगे, क्षमा बरडे, वसुंधरा मधाळे, सुनंदा रामटेके, अलका धोंडाणे-साखरे आदी कावयित्रींनी सहभाग घेतला.
संमेलनाची सांगता भीम शाहिरी जलशाने झाली. यावेळी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या