वंचित बहुजन आघाडीचे 18 जालना लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार बकले प्रभाकर देवगन यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार असून या सभेचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांनी केले आहे.
औंरगाबाद/प्रतिनिधी - 18 जालना लोकसभा मतदार संघ, वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर देवगन बकले यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या जाहीर सभेचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतिश गायकवाड यांनी आयोजित केली असून ही सभा आज सायं. 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे. सभेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या