उपोषणकर्त्या शेतकरी महिलांना न्याय द्या ; सागर भवते

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उपोषणकर्त्या शेतकरी महिलांना न्याय द्या ; सागर भवते

वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते उपोषणकर्त्या शेतकरी महिलांना न्याय द्या, अशी मागणी केली आहे.


अमरावती/प्रतिनिधी - गेल्या 10 जून पासून वरुड तालुक्यातील मौजा पुसला येथील शेतकरी महिला वनविभागाने केलेल्या अन्याया विरोधात वरुड तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकरी महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करताना केली आहे.

पुसला येथील सुशीला बिडकर व बेबी बिडकर नामक दोन शेतकरी महिला आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी जंगलातील वन्य प्राण्यांचा सामना करून शेती करतात ही गौरवाची बाब असताना त्यांच्या शेतीच्या पीक नुकसानीचे चुकीचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत देण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडथडा निर्माण केला आहे 6 महिने वनविभागाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्यानन्तर सुद्धा पदरी अपयश आल्याने त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा दोषी अधिकारी यांचेवर कारवाई करून उपोषणकर्त्या शेतकरी महिलांना न्याय देण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सागर भवते यांनी दिला आहे. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपोषणकर्त्या महिलांशी संवाद साधून आपला पाठिंबा जाहीर केला.


उपोषण मंडपात भेट देताना यावेळी फुले आंबेडकर विद्वत सभा समन्वयक सिद्धार्थ भोजने, जेष्ठ नेते सतीश सोनूले, वरुड तालुका अध्यक्ष रविंद्र डोंगरे, ऍड. पवन वाढीवे, विनोद खाकसे सह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या