तिवसा तालुक्यातील धारवाडा येथील पुनर्वसित बौद्ध बांधवांना सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
अमरावती/प्रतिनिधी - तिवसा तालुक्यातील धारवाडा- दुर्गवाडा येथे पुनर्वसित बौद्ध बांधवांची वस्ती आहे. परंतु महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी तथा इतर सामाजीक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून बौद्ध बांधवांची गैरसोय होत आहे. व जागेच्या अभावी धारवाडा येथे कार्यक्रम घेण्यास अडचण निर्माण होते. सदर जागेची मागणी करिता गावातील महिला व युवकांनी मंडळाचे वतीने जिल्हा पुनर्वसन प्रशासनकडे वारंवार निवेदने दिली परंतु शासनाने त्यांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचे नेतृत्वाखाली शेकडो पुनर्वसितांनी आज 4000 चौ. फूट सामजिक भूखंडची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. पुनर्वसन कायद्यातील तरतूदीनुसार पुनर्वसितांना धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता भूखंड उपलब्ध करून देणे गरजेचे असताना स्थानिक लोकप्रतिनिधीनी बौद्ध बांधवांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून 15 वर्षापासून तिवसा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीनी फक्त पुनर्वसितांच्या प्रश्नाचे भांडवल केल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केला आहे.
धरणे आंदोलनात यावेळी भारतिय बौद्ध महासभाचे विजयकुमार चौरपगार, विद्वत सभाचे सिद्धार्थ भोजने, वंचित बहुजन आघाडीचे बाबाराव गायकवाड, आनंदराव इंगळे, राहुल मेश्राम, प्राजक्ता पिल्लेवान, विजय डोंगरे, शैलेश बागडे, रोषण गजभिये, विनय बांबोळे, रिना गजभिये, अजय रामटेके, अजय तायडे, सचिन जोगे, अमोल जवंजाळ, विनोद खाकसे, विनोद खोब्रागडे, प्रवीण काळे, सागर काळे, संदीप काळे, अवधूत बन्सोड, देवानंद काळे, मंगेश काळे, निखिल बन्सोड, साधना काळे, शिला बन्सोड, माया काळे, भाग्यश्री काळे, अर्चना काळे सह पुनर्वसित बांधव व वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या