औरंगाबाद/प्रतिनिधी - बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर भैय्यासाहेब आंबेडकर यांनी देशभरात चळवळ उभी केली. चळवळीला दिशा दिली. परंतु अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. भैय्यासाहेबांच्या निधनानंतर आंबेडकरी साहित्यिकांनी त्यांच्या कार्य इतिहासाची नोंद घेतली नसल्याची खंत आंबेडकरी विचारवंत डॉ. भगवान धांडे यांनी व्यक्त केले.
ते स्थानिक सत्यशोधक समाज कार्यालयात (दि. १७ सप्टेंबर) सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेतून बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. धांडे म्हणाले की, भैय्यासाहेब आंबेडकर आमदार असताना त्यांनी सकाळच्या शाळेचा प्रश्न, गिरणी कामगारांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशभरात बाबासाहेबांचे स्मारके उभी केली. प्रबुद्ध भारत वृत्तपत्र अविरतपणे चालविले. परंतु हा इतिहास दडपण्याचा प्रयत्न सातत्याने झाला आणि आजही होतो आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोधाचार्य व्ही. के. वाघ हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. प्रज्ञा साळवे, धनराज गोंडाने, रतनकुमार साळवे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, ऍड. डी. व्ही. खिल्लारे, इंजि. महेश निनाळे, पंडितराव तुपे, ऍड. एकनाथ रामटेके, गंगाबाई सुरडकर, मधुकर खिल्लारे, ऍड. संघपाल भरसाखडे, मधुकर दिवेकर, डॉ. अविनाश अंकुशराव, अमरदीप वानखडे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या