संविधान जागर साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - काँग्रेस - आणि भाजप पक्ष या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. भाजपने संविधान बदलण्याचा घाट घातला असताना, संविधानातील मसुद्याशी छेळछाळ होत असताना कॉग्रेस शासित राज्यात मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर येत नाही, उलट नॉन क्रिमिनियलच्या संदर्भाने काँग्रेस शासित राज्यामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे संविधान बदलणारे कोण? आणि वाचवणारे कोण? याबाबत आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज असून केवळ संविधान हातात घेऊन फिरणे म्हणजेच संविधान वाचविणे असे नव्हे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केले.
त्या स्थानिक संत एकनाथ रंगमंदिर येथे फुले-आंबेडकर विद्वत सभा आयोजित संविधान जागर साहित्य संमेलनाच्या उद्घघाटीय भाषणातून बोलत होत्या.
यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत ऍड. श्याम तांगडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रमोद दुथडे (प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते), फुले आंबेडकर विद्वत सभेचे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार भास्कर भोजने, फुले - आंबेडकर विद्वत सभेचे प्रदेश समन्वयक डॉ. मनोज निकाळजे, डॉ. विनोद उपर्वट, डॉ. शहाजी चंदनशिवे, से.नि. पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के, संत कबीर शिक्षण संस्थेचे सचिव ऍड. धनंजय बोर्डे, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, बोधाचार्य व्ही. के वाघ, डॉ. संजय मून, प्रा. भारत सिरसाट, रतनकुमार साळवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी ९ वाजता क्रांती चौक ते संमेलनस्थळ अशी संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. यामध्ये मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल, नागसेनवन येथील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकासह सहभाग नोंदविला. रॅलीला संमेलनाध्यक्ष श्याम तांगडे यांनी निळा झेंडा दाखवून उदघाटन केले. संमेलनाची सुरुवात संविधान प्रस्ताविकेची प्रस्तावना वाचून करण्यात आली.
पुढे बोलतांना प्रा. आंबेडकर म्हणाल्या की, संविधान टिकविण्यासाठी आपल्याला प्रबुद्ध मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. समाजाला प्रबुद्ध दिशेने घेऊन जावे लागणार आहे. स्वतःचे स्वाभिमानी, ताठपणाचे राजकारण उभे करावे लागणार आहे. त्याची सुरुवात आज औरंगाबाद येथून होत आहे ही ऐतिहासिक बाब आहे.
भास्कर भोजने यांनी भूमिका मांडताना सांगितले की, संविधानाच्या 75 वर्षातच संविधानावर हल्ला होत आहे. शासनाने प्रशासनाला हाताशी धरून संविधान बदलण्याचा घाट घातला आहे. दररोज संविधानावर हल्ला चढवला जात आहे, याचा निषेध म्हणून, प्रतिहल्ला म्हणून समाजाला जागृत करण्यासाठी संविधान जागर साहित्य संमेलन आज याठिकाणी बुद्धिवंतांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.
अध्यक्षीय समारोपात ऍड. श्याम तांगडे बोलताना म्हणाले की, साहित्यिक विचारवंतांनी समाजाला दिशा देणारे लेखन केले पाहिजे. केवळ लेखनच करू नये तर त्याच्या वागण्यातूनही ते स्पष्ट दिसले पाहिजे. नाही तर आज घडीला स्वतःला प्रख्यात साहित्यिक - विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांची त्यांच्या लेखनातून एक आणि विचारातून एक अशा दुहेरी भूमिका दिसून येतात. यातील बहुतांश साहित्यिकांनी समाजाची बदनामी करणारे लेखन केले आहे. आताची पिढी वाचन सांस्कृती विसरत चाललेली आहे. संविधान जागर साहित्य संमेलन म्हणजे वाचन संस्कृती रुजविण्यासाठी, खोटारड्यांच्या विरोधात बोलण्यासाठी आणि आपल्यावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज बुलंद करून लोक चळवळ उभी करणारी नांदी आहे. उदघाटन सत्राचे सूत्र संचालन डॉ. प्रज्ञा साळवे यांनी केले तर आभार डॉ. मिलिंदराज बुक्तरे यांनी मानले.
एस्सी, एस टी वर्गीकरण आणि क्रिमिलेअर सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षण संबधी निकाल अनव्यार्थ या विषयावर अर्थतज्ज्ञ प्राचार्य डॉ. इंद्रजित आल्टे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला वक्ते म्हणून माजी न्यायाधीश अनिल वैद्य, आय एल एस पुणे येथील प्रा. डॉ. नितीश नवसागरे उपस्थित होते.
या सत्राचे सूत्रसंचालन रतन साळवे यांनी केले तर आभार डॉ. संजय साळवे यांनी मानले.
डॉ. प्रतिभा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसमेलन संपन्न झाले. त्यामध्ये देवानंद पवार, यशवंत खडसे, धोंडोपंत मानवतकर, सुनील उबाळे, मधुकर दिवेकर आदींचा सहभाग होता. सूत्रसंचालन धम्मापाल जाधव यांनी केले. आभार दैवशाला गवंदे यांनी मानले.
समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रा. अंजली आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकारी बँकचे अध्यक्ष पी. बी. अंभोरे, प्राचार्य एम. ए. वाहुळ, जेष्ठ विचारवंत डॉ. आर के क्षीरसागर, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. एस. आर बोदडे आदी उपस्थित होते. समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन प्रा. भारत सिरसाट यांनी केले. आभार अमरदीप वानखडे यांनी मानले.
यावेळी अशोक जोहरे, डॉ. यशवंत खडसे, डॉ. रेखा मेश्राम, शारदा पगारे, विद्या साळवे, सागर चक्रनारायण,धम्मप्रिया खरात, प्रा संगीता अंभोरे, दादाराव त्रिभुवन, जितेंद्र भवरे, राहुल गवळी, अविनाश अंकुशराव, राजेश शेगावकर, सविता अभ्यंकर, गंगाबाई सुरडकर
अमरदीप वानखडे, मिलिंदराज बुक्तरे आदीं आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या