अॅड. बाळासाहेब आंबेडकर, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची असणार प्रमुख उपस्थिती.
छत्रपती संभाजीनगर : फुले-आंबेडकर विद्वत सभा, महाराष्ट्र राज्याच्या वतीने शाखा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे रविवार, दि. २९/९/२०२४ रोजी सकाळी ८ ते सायं. ७ वाजेपर्यंत संविधान जागर साहित्य संमेलन-२०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष अॅड. शाम तांगडे (ज्येष्ठ विचारवंत), अंबाजोगाई हे राहणार आहेत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रमोद दुधडे (प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते) हे आहेत. या संमेलानाला समारोपीय मार्गदर्शन अॅड. बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत. अशी माहिती संमेलनाच्या मुख्य निमंत्रक डॉ. प्रज्ञा साळवे, प्रा. भारत सिरसाट, रतनकुमार साळवे यांनी आज (दि. 25/09/2024) रोजी स्थानिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेतुन दिली.
उद्घाटन सत्रात या संमेलनाची भूमिका भास्कर भोजने हे मांडणार आहेत. या उद्घाटन सत्रात प्रमुख उपस्थिती, डॉ. मनोज निकाळजे, डॉ. विनोद उपर्वट, डॉ. शहाजी चंदनशिवे, बालाजी सोनटक्के, अॅड. धनंजय बोर्डे, अशोक येरेकर, व्ही.के. वाघ यांची राहणार आहे.
दि. २९//९/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता क्रांती चौक ते संत एकनाथ रंगमंदिर भव्य संविधान सन्मान रॅली निघणार आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन मा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२ वाजता भारतातील एस्सी., एस.टी. प्रवर्गावर अन्यायकारक झालेला निर्णय ‘एस्सी., एस.टी. वर्गीकरण आणि क्रिमिलेअर सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षण संबंधी निकाल अन्वयार्थ - भूमिका’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अर्थतज्ञ प्राचार्य डॉ. इंदजित आल्टे हे राहणार आहेत. या परिसंवादातील महाराष्ट्रातील प्रख्यात वक््ते, माजी न्यायाधीश अनिल वैद्य (नाशिक), व डॉ. नितिश नवसागरे (कायद्याचे प्रसिद्ध अभ्यासक, पुणे) हे सहभागी आहेत.
सायं. ४ वाजता कविसंमेलन पार पडणार आहे. या कविसंमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्ध कवयित्री प्रतिभा अहिरे (कन्नड) या राहणर आहेत. यामध्ये कवी देवानंद पवार, यशवंत खडसे, धोंडोपंत मानवतकर, सुनील उबाळे, मधुकर दिवेकर हे आपल्या कविता सादर करणार आहेत.
या संमेलनाच्या समारोपाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती राहणार आहे. या समारोपिय कार्यक्रमाध्ये प्रमुख उपस्थिती पी.बी. अंभोरे, डॉ. एम.ए. वाहुळ, डॉ.आर.के. क्षीरसागर, अॅड. एस.आर. बोदडे हे राहणार आहेत. या ऐतिहासिक संमेलनासाठी सर्वांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला डॉ. यशवंत खडसे, धनराज गोंडाणे, दैवशिला गवंदे, शोभा खाडे, जितेंद्र भवरे, अमरदीप वानखडे, आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या