डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतली शेवची पेट परीक्षा-२०२४
छत्र
पती संभाजीनगर: दि.१९/१०/२०२४ रोजी त्यागमूर्ती रमाई बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.शिलवंत गोपनारायण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिव, उपकुलसचिव यांना ई मेल द्वारे मागणी केली की, ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या शेवटच्या पेट परीक्षा-२०२४ परीक्षार्थींना दिली जाणारी ओ. एम.आर. सीट ने दिल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने परीक्षार्थींना हरकती नोंदवण्याकरिता नेमक्या कोणत्या प्रश्नाबद्दल हरकत नोंदवायची हे कळणे मुस्किल होत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव मोरे व डॉ. प्रविण यन्नमवार यांचेशी प्रा.गोपनारायण यांनी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, परीक्षार्थींना प्रश्न पत्रिका, उत्तरपत्रिका व ग्रीवीयन्स फॉर्म आम्ही दिलेले आहेत त्यावरून परीक्षार्थीं उत्तरांसंदर्भात हरकती नोंदवू शकतात परंतु वास्तविक पाहता OMR शिवाय हरकती नोंदवणे शक्यच नसल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे.
करीता प्रा.गोपनारायण यांनी ई-मेल द्वारे मागणी केली की, OMR देऊन परिक्षार्थींना दिलासा द्यावा व पेट परीक्षा- २०२४ अधिक पारदर्शक व्हावी.
OMR शीट दिल्यानंतर हरकती नोंदवण्याकरिता किमान १० दिवसांचा कालावधी वाढवून देणून उपकृत करावे अशी सुद्धा रास्त मागणी ईमेल द्वारे केली आहे.
0 टिप्पण्या