प्रा. अविनाश डोळस यांच्या स्मृती दिनानिमित्त "वंचितांचे राजकारण : संधी आणि आव्हाने या विषयावर व्याख्यान संपन्न
छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - विशिष्ट कुटूंबाची, प्रस्तापित राजकीय पक्षांची गुलामी झुगारून स्वाभिमानी राजकारण उभे करण्याची मोठी संधी वंचित बहुजन समूहाकडे असून या निवडणुकीत स्वतःचे स्वाभिमानी राजकारण उभे करण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केले.
त्या आज (दि. १४ नोव्हे.) प्रा. अविनाश डोळस यांच्या स्मृती दिनानिमित्त स्थानिक यशवंतराव चव्हाण सभागृहात "वंचितांचे राजकारण : संधी आणि आव्हाने" या विषयावर आयोजित कार्यक्रमातून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय मुन हे होते. यावेळी जॅकलिन डोळस, वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार मोहम्मद जावेद मो. इसाक कुरेशी, फुलंब्री मतदार संघातील उमेदवार इंजि. महेश कल्याणराव निनाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. प्रज्ञा साळवे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मो. जावेद कुरेशी, इंजि. महेश निनाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. संजय मुन म्हणाले की, जातीपाती मोडून सत्तेचे राजकारण करायचे असेल तर बहुसंख्यांक होण्याची गरज आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचा एक जातीय पासून बहुजातीय, बहुजातीय पासून बहुजन आणि बहुजनांपासून वंचितांपर्यंत असलेला राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने लोकशाहीचे समाजिकीकरण करणारा असून वंचित बहुजनाला सत्तेची वाट दाखविणारा आहे. देशामध्ये धर्मांध शक्तीची सत्ता हे काँगेसच्याच नाकारर्तेपणामुळे आली असल्याची टीकाही डॉ. मुन यांनी यावेळी केली.
चौकट
रेखा ठाकूर म्हणाल्या की, प्रा. अविनाश डोळस यांचा प्रवास दलित युवक आघाडीपासून वंचित बहुजन आघाडी पर्यंतचा. अनेक आंदोलने, मोर्चे आणि लोकशाहीचे समाजिकीकरण करण्यासाठीचा मोठा लढा त्यांनी उभारून समताधिष्ठित समाज व्यवस्थेच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.
सूत्रसंचालन प्रा. भारत सिरसाट यांनी केले तर आभार अमरदीप वानखडे यांनी मानले.
0 टिप्पण्या