समता सैनिक दलाचे शिबिर उत्साहात संपन्न

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

समता सैनिक दलाचे शिबिर उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी - "एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर" बुद्ध लेणी पूज्य भंते महास्थवीर विश्वदानंद बोध यांचे विहार छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले, पूज्य भंते नागसेन महाथेरो व महानगर जिल्हाध्यक्ष रमेश बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी जिल्ह्याचे सरचिटणीस भास्कर म्हस्के यांनी प्रास्ताविक केले, सदर प्रशिक्षणास लेफ्टनंट कर्नल जयवंत गायकवाड व लेफ्टनंट कर्नल अनिल राऊत यांनी प्रशिक्षण दिले.



 याप्रसंगी सैनिक राजेंद्र गंगावणे व इतर पदाधिकारी समारोप प्रसंगी उपस्थित होते. सायंकाळी समारोप करण्यात आला. याप्रसंगी मध्य छत्रपती शहराध्यक्ष संभाजीनगरचे प्रा.डॉ. शिलवंत गोपनारायण तसेच लेफ्टनंट कर्नल विलास पठारे यांनी मार्गदर्शन केले व जिल्हाध्यक्षांच्या हस्ते झेंडा उतरवून समारोप करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या