छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी - चैत्यभूमी चे निर्माते, बौद्धाचार्यांचे जनक भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्त साजरी करण्यात आली.
नंदनवन कॉलनी येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राजू कीर्तने यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे छत्रपती संभाजीनगर महानगर जिल्हाध्यक्ष रमेश दादा बनसोडे, जिल्हा संघटक चंद्रकांत लहाने, रोहित शिंदे, भीमराज सरदार व दाभाडे बंधू आदी भीम बुद्ध अनुयायी उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभेचे छ. संभाजीनगर (मध्य) शहराध्यक्ष सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. शिलवंत गोपनारायण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यकारणीच्या आदेशानुसार सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांची जयंती देशभरातील प्रत्येक शाखे मध्ये १२/१२/२०२५ ते ३१/१२/२०२५ दरम्यान साजरी करण्यात आली.


0 टिप्पण्या