छ. संभाजीनगर / रमाई फाउंडेशन व रमाई मासिक औरंगाबादच्या वतीने रमाई मासिकाचा १६ वर्धापनदिन व भारतीय स्त्रीमुक्त दिनाचे आयोजन दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता मराठवाडा साहित्य परिषद, रॉक्सी टॉकिजजवळ, पैठणगेट येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक फुले-आंबेडकर विद्वत सभेचे भास्कर भोजने (अकोला) हे आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय मून हे असणार आहेत. तर प्रमुख वक्ते जिजाऊ ब्रिगेडच्या अॅड. वैशाली डोळस व बौद्ध विचारवंत डॉ. भगवान धांडे हे राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक समाजाचे अॅड. के.ई. हरिदास, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस.आर. बोदडे, बौद्ध साहित्यिक डॉ. धनराज गोंडाणे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष, कोमल हिवाळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वंदना जाधव व साधना पठारे या उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रमाई फाऊंडेशनच्या प्रा. रेखा मेश्राम (संपादक रमाई मासिक) तसेच प्रा. डॉ. रेखा मेश्राम (संपादक, रमाई मासिक, अध्यक्ष-रमाई फाऊंडेशन),दैवशीला गवंदे, ललिता खडसे, शोभा खाडे, बेबीनंदा पवार, जयश्री सरोदे, डॉ. प्रज्ञा साळवे, डॉ. वंदना पाटील, मंगल मून, नेहा बनसोडे, राजकन्या गोंडाणे, डॉ. ललिता गिर्हे, सुनंदा जाधव,रत्नकला बनसोड, गंगाबाई सुरडकर, संघमित्रा खंडाळकर, विद्या साळवे व समस्त रमाई फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनी केले आहे.


0 टिप्पण्या