प्राचार्य डॉ. संजय मून यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन ; रमा आंबेडकर-तेलतुंबडे यांची प्रमुख उपस्थिती

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्राचार्य डॉ. संजय मून यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन ; रमा आंबेडकर-तेलतुंबडे यांची प्रमुख उपस्थिती


 

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी : रमाई मासिक, रमाई फाऊंडेशन आणि सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध कवी, साहित्यिक आणि विचारवंत प्राचार्य डॉ. संजय मून यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा येत्या सोमवारी, १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पैठण गेट येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात पार पडणार आहे. हा सत्कार समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमा आंबेडकर-तेलतुंबडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे असतील. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकरी विचारवंत डॉ. ऋषीकेश कांबळे आणि साहित्यिक डॉ. दासू वैद्य आपले विचार मांडतील.

 


या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. रेखा मेश्राम (संपादक, रमाई मासिक), प्रा. भारत सिरसाट (अध्यक्ष, सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान) यांच्यासह डॉ. सुमेध रणवीर, डॉ. कैलास वानखडे, डॉ. ललिता गोपाळ, डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. रामेश्वर चाटे, छाया साळवे, पल्लवी जमधडे, दैवशाला गवंदे, डॉ. धनराज गोंडाणे, रतनकुमार साळवे, अनंत भवरे, अमरदीप वानखडे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या