जिजाऊंचे संस्कार व विवेकानंदांचे विचार आजही मार्गदर्शक - प्रा. विश्वजीत वानखडे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जिजाऊंचे संस्कार व विवेकानंदांचे विचार आजही मार्गदर्शक - प्रा. विश्वजीत वानखडे

ड्रीम स्वेअर अकॅडमीच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

बाळापूर, प्रतिनिधी - राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांचे योगदान महत्त्वाचे असून जिजाऊंचे संस्कार व विवेकानंदांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन ड्रीम स्वेअर अकॅडमीचे संचालक प्रा. विश्वजीत वानखडे यांनी यावेळी व्यक्त केले.

ड्रीम स्वेअर अकॅडमी बाळापूरच्या वतीने ड्रीम स्वेअर अभ्यासिका श्रीराम मंदिर सभागृह येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ड्रीम स्वेअर अकॅडमीचे संचालक प्रा. विश्वजीत वानखडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद तेलगोटे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. उमेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजना तायडे, रोहिणी राऊत, वृषाली वानखडे, मंगेश नितनवरे, गौरव नळकांडे, गौरव तायडे, रोशन दामोदर आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या