अशोक ढोलेंच्या कविता विद्रोह पुकारणाऱ्या- प्रा. भारत सिरसाट

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अशोक ढोलेंच्या कविता विद्रोह पुकारणाऱ्या- प्रा. भारत सिरसाट

वरखेड येथे काळोखमुक्ती काव्यसंग्रहाचे प्रकाशन



तिवसा/प्रतिनिधी - कविता म्हणजे फक्त शब्द नसून त्या बडांचे निशाण असतात. अशा बंडखोर कवितेने आंबेडकरी साहित्य समृद्ध केले आहे. त्यात आंबेडकरी कवी स्मृतिशेष अशोक ढोलेंच्या क्रांतीप्रवन कविता ह्या विद्रोह पुकारणाऱ्या आहेत असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक प्रा. भारत सिरसाट यांनी केले. ते वरखेड येथे आयोजित काळोखमुक्ती काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.



बोलताना प्रा. सिरसाट पुढे म्हणाले की, समाजाला दिशा देण्याची जबाबदारी साहित्यिकांवर असताना कवी अशोक ढोले यांच्या मरणोत्तर काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्याची संधी रमाई प्रकाशनला मिळाल्याने त्यांच्यातील प्रचंड विद्रोहाची जवळून जाणीव झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते धीरज केने यांच्या विशेष पुढाकारातुन विदर्भातील प्रसिद्ध आंबेडकरी कवी स्मृतिशेष अशोक ढोले यांच्या मरणोत्तर काळोखमुक्ती काव्यसंग्रहाचे प्रकाशन जन्मगाव वरखेड येथे मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी साहित्यिक प्रा. भारत सिरसाट तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे, प्रा. सुभाष गडलिंग, प्रा. रवी दलाल, स्वागताध्यक्ष विनायक केने, अस्मिता ढोले यांची उपस्थिती होती.



आंबेडकरी साहित्याला परिवर्तनाचा वारसा लाभला असून वरखेडच्या मातीत दलित साहित्याची मुहूर्तमेढ रोवणारे अशोक ढोलेंच्या कविता आंबेडकरी साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या आहे असे मत डॉ. रवींद्र मुंद्रे यांनी व्यक्त केले तर अशोक ढोलेंच्या कवितेने मानवी समाजाला विद्रोहाचे धडे दिले असून त्यांचा काव्यसंग्रह आजही साहित्यक्षेत्रात ताकदीने उभा राहील असे विचार प्रा. सुभाष गडलिंग यांनी मांडले. अशोक ढोलेंचे दर्जेदार साहित्य आज उशिराने का होईना परंतु आज त्यांच्या प्रकाशित काव्यसंग्रहाच्या निमित्ताने कवितांना न्याय मिळाला असल्याची भावना साहित्यिक रवी दलाल यांनी व्यक्त केली.



कवी अशोक ढोले यांच्या निधनाने आंबेडकरी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांचे अप्रकाशित साहित्य जनतेसमोर आनण्याची जबाबदारी नवलेखकांची असून ढोलेंच्या विद्रोही कवितेचा वारसा आम्ही जपण्यासाठी कटिबद्ध असू असा विश्वास प्रास्ताविक प्रसंगी सागर भवते यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्वाला ढोले तर आभार वंदना हरणे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कवी अशोक ढोले स्मृती प्रतिष्ठान, रमाई महिला मंडळ वरखेड यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या