महामानवाच्या नातवाच्या आड याल तर फुटबाॅल केल्या जाईल - दीपक केदार यांचा इशारा...

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महामानवाच्या नातवाच्या आड याल तर फुटबाॅल केल्या जाईल - दीपक केदार यांचा इशारा...

सोशल मीडियावरील प्रकाश आंबेडकरांच्या बदनामीवर आँल इंडिया पॅंथर सेना आक्रमक 

Social24Network


मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राजांवर केलेल्या टीकेमुळे दोन्ही राजांच्या कार्यकत्र्यांकडून अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. दोन्ही राजांच्या समर्थकांकडून अँड. आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. यावर आँल इंडिया पॅंथर सेना आक्रमक झाली असून महामानवाच्या नातवाच्या आड याल तर फुटबाॅल केल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे.

यासंदर्भात त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ज्यांच्या लेटरहेडवर शाहू महाराजांचा फोटो नाही त्यांनी शाहू महाराजांचं नाव घेऊ नये. शाहू महाराजांचं नाव घेण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. आमच्या घरा घरात शाहू महाराज आहेत. महामानवांनी आम्हाला सांगितलं शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा. आम्ही शाहू महाराजांची जयंती सण उत्सवासारखी साजरी करतो, त्यांचा वैचारिक वारसा आम्ही चालवतो. अक्कलशून्य भंपकबाजानी आमचं आकलन करू नये. ज्यांच्या लेटरपॅडवर, कार्यालयात, घरात शाहू महाराज नाहीत. त्यांनी आधी घरा घरात शाहू महाराज घेऊन जाईची मोहीम राबवावी. शाहू महाराजांचे लाखो फोटो आम्ही उपलब्ध करून देऊ. शाहु महाराज गरिबांचे कैवारी होते, लोकांचे राजे होते, शोषित पीडित दलितांचा त्यांना कनवळा होता. म्हणून त्यांना हिणवून दलितांचा राजा संबोधून घरात फोटो न लावणाऱ्या "शाहूद्रोहीनी" आम्हाला इतिहास शिकवू नये.

स्वयं घोषित जाणता राजाच्या इशाऱ्यावर सत्तेत मलिदा खायला मिळेल, या प्रमुख उद्देशाने प्रेरित होऊन संघटना काढणाऱ्यांनी तेच काम करावं. आम्ही खऱ्या राजेंचे वैचारिक वंशज आहोत. कुणालाही जाणता राजा म्हणून मिरवणारे गुलाम नाहीत. महाराजांनी आम्हाला स्वाभिमान दिला तो या महाराष्ट्रात आम्ही जिवंत ठेवत आहोत. इतिहास निर्मात्यांना इतिहास शिकू नये. छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवार घेऊन गेलेल्या कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या औलादींचे "बटीक" झालेल्यांनी आम्हाला इतिहास शिकवू नये. आम्ही "होता जिवा म्हणून वाचला शिवा" त्या जिवा महालांचे वंशज आहोत. १८ पगड जाती, अलुतेदार-बलुतेदार रयतेच्या रक्षणासाठी नव्या स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढला आहे. समग्न रयतेच्या राजाला एका जातीत कैद करण्याचे मनुवाद्यांचे मनसुबे उधळून लावणारे आम्ही मावळे आहोत. छावाचे स्व.देविदास वडजे आज आपल्यात नाहीत, जरा आकलन करा मराठा शेतकऱ्यांसाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी या मराठा नेत्यांबरोबर आंदोलन केली. मराठा शेतकरी आत्महत्या विरोधात, पिकाच्या भाववाढीसाठी, अकोल्यात मोफत खत वाटप करणारे बाळासाहेब एकमेव आहेत. मराठा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी या महाराष्ट्रात ऍड. बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरलेले आहेत. शेतकन्यांना आत्महत्या करायला लावणाऱ्या स्वयंघोषित जाणता राजाच्या रक्षणासाठी "संघटना" काढून मलिदा चाटत बसले नाहीत.

महाराष्ट्रात ज्यांना कुणी ओळखत नाही ते पत्रक काढून फिरू न देण्याच्या धमक्या देतात. आपलं अस्तित्व काय? आपली ओळख काय? प्रसिद्धीसाठी उचलली जीभ लावली टाळ्याला हा एककलमी कार्यक्रम नेता होण्यासाठी सुरु झालेला आहे. यादराखा, महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा महाराजांचं राज्य कुणी आगीच्याहवाली करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. हे आमच्या बापाचं रयतेचं राज्य अबाधीत ठेवण्यासाठी संघर्ष करत राहणार. विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वैचारिक वारस जगात ज्यांची कीर्ती आहे त्यांच्या विरोधात कुणी चिटूरी काढून प्रसिद्धी मिळवत असेल, आम्हाला आमच्या अस्मितेला ललकारण्याच काम कुणी करत असेल, महाराष्ट्रात फिरून देण्याची भाषा करत असेल तर हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे आडवे येऊन पहा फुटबॉल केल्या शिवाय सोडणार नाही हा आमचा इशारा आहे.



   

काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...

या कारणामुळे बाळासाहेब उदयनराजेंना ‘‘बिनडोक’’ म्हणाले...

प्रकाश आंबेडकर चुकीचे बोलले नाहीत ; खा. संभाजी राजे

हा तर संघ-भाजपाचा कट - श्रीमंत कोकाटे

बिनडोक म्हणजे शिवी नाही ; बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घ्या... - प्राचार्य म.ना. कांबळे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या