मागासवर्गीय अधिका-यांना पदोन्नतीतील आरक्षण मिळू नये म्हणून श्रीमंत मराठा डाव आखतोय ; अँड. प्रकाश आंबेडकरांची प्रखर टीका

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मागासवर्गीय अधिका-यांना पदोन्नतीतील आरक्षण मिळू नये म्हणून श्रीमंत मराठा डाव आखतोय ; अँड. प्रकाश आंबेडकरांची प्रखर टीका

Wealthy-Marathas-are-plotting-to-prevent-backward-class-officers-from-getting-reservation-in-promotion-And-Prakash-Ambedkar's-strong-criticism

Social24Network 

मागासवर्गीय अधिकारा-यांना पदोन्नतील आरक्षण मिळू नये म्हणून श्रीमंत मराठा सरकारच्या आडून डाव आखत असल्याची घाणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. या विरोधात ज्या अधिका-यांची नावे पदोन्नतील आरक्षण यादीमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या कुटुंबासह आंदोलन उभे करण्याचे आवाहन यावेळी अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.  

या संदर्भात अँड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की, महाराष्ट्र शासन आरक्षणाच्या संदर्भाने मागासवर्गीयांना फसवत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने डेटा मागीतलेला आहे. डेटा कुठला मागीतला आहे तर किती पदं मागास वर्गीयांची भरल्या गेली आहेत? किती पदं भरल्या गेलेली नाहीत. तो डेटा जीएटी डिपार्टमेंटकडे आहे. पण महाराष्ट्र शासन तो डेटा सादर करीत नाही. काल परवा त्यांनी जाहिर केलं आहे की, मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भांत एक समिती गठीत केली आहे. ही समिती फसवी आहे. श्रीमंत मराठ्यांचा मागासवर्गीय अधिका-यांना प्रमोशन मिळू नये म्हणून हा डाव आहे. याचा आम्ही निषेध करतो. आणि सर्व मागासवर्गीय अधिकारी जे प्रमोशनला आहेत जे त्या लिस्टमध्ये आहेत त्यांनी आपल्या कुटुंबासह आंदोलन उभे करा. अशी अपेक्षा.

Wealthy-Marathas-are-plotting-to-prevent-backward-class-officers-from-getting-reservation-in-promotion-And-Prakash-Ambedkar's-strong-criticism

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या