Agreements-from-"that"-meeting-for-relatives'-organizations-Ambedkar's-appeal-to-the-workers-to-continue-the-strike
Social24Network
राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसदर्भांत नुकतीच सर्वपक्षिय बैठक पार पडली असून या बैठकीला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थीत होते. ही बैठक नातेवाईकांच्या युनियन्स बरोबर करार करणारी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली असून या बैठकीत झालेला करार हा ऊसतोड कामगारांच्या विरोधात असून कामगारांनी संप सुरूच ठेवण्याचे आवाहन यावेळी अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
अँड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की, साखर संकुलात ज्या नातेवाईकांच्या युनियन्स आहेत त्यांच्याबरोबर करार करण्यात आला. हा करार ऊसतोड कामगारांच्या विरोधात आहे, वाहतुकदारांच्या विरोधात आहे, कमिशन एजंट यांच्या विरोधात आहे. ऊसतोड कामगारांना काहीही वाढीव मिळालेलं नाही. मी सर्व कामगारांना विनंती करतो की, आपण हा करारनामा मान्य करू नये. अजून त्यावर सह्या झालेल्या नाहीत. नुसतं ते वापरणार आहेत. शक्य असल्यास जो पर्यंत संप वाढविता येईल तो पर्यंत तो वाढवावा. कामावर जाण्याची काही गरज नाही आणि हा करारनामा आम्ही मान्य करणार नाही असे आम्ही जाहिर करतो.
Agreements-from-"that"-meeting-for-relatives'-organizations-Ambedkar's-appeal-to-the-workers-to-continue-the-strike
0 टिप्पण्या