अन्यथा मोदींची अवस्था ट्रम्पसारखी होईल ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अन्यथा मोदींची अवस्था ट्रम्पसारखी होईल ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

(फोटो सौजन्य फेसबुक)


Social24Network

मोदी सरकारमध्ये संवेदनशीलता नाही. मोदी हुकुमशाही मानसिकतेत वावरत आहेत. त्यांनी हुकुमशाह होण्यापेक्षा आंदोलनांना परिपक्वतेपणे हाताळले पाहिजे. अन्यथा येत्या काळात मोदींची अवस्था ट्रम्प सारखी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रखर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 


आज प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर मोर्चावर दिल्ली येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी अ‍ॅड. आंबेडकरांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आरएसएस-भाजप सरकारने शेतकरी ट्रॅक्टर मोर्चावर केलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. लाल किल्ला लोकशाहीचे प्रतीक आहे, परंतु लोकशाहीचे प्रतिनिधित्व लोकशाही सरकारांनी केले पाहिजे. या आरएसएस-भाजपा सरकारने हुकूमशहा असण्याऐवजी परिपक्वतासह निषेध हाताळायला शिकले पाहिजे.


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, शेतक-यांच्या ट्रॅक्टर मोर्चावर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज अत्यंत चुकीचा आहे. लाल किल्ला हा सर्वांचा आहे. तो लोकशाहीचे प्रतिकही आहे. आंदोलन करणं हे लोकशाहीमध्ये जनतेचा अधिकार आहे. पण हुकुमशाही सरकारला जनताच लोकशाहीचे प्रतिक आहे हे सांगणे गरजेचे आहे. कुठलेही आंदोलन हे परिपक्वतेने सरकारने हाताळता आले पाहिजे, ही परिपक्वता मोदी सरकारमध्ये नाही, म्हणुन पहिल्यांदा सरकारने आंदोलन परिपक्वतेने हाताळणे शिकावे, अशी तीव्र प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या