Sharad Pawar and the NCP following the Vedic tradition; Adv. Prakash Ambedkar
Social24Network
महिलेच्या चारित्र्याची खुलेआम चर्चा करणारे वैदिका परंपरा मानणारे आहेत. मी वैदिक परंपरा मानत नाही तर संत परंपरा मानतो. संतांनी समाजामध्ये पूर्नविवाह व्यवस्थेचा प्रचार-प्रसार केला आणि तो समाजामध्ये लागु केला. त्यामुळे जे जे लोक महिलेच्या चारित्र्याबद्दल शंका घेतात ते वैदिक परंपरा मानणारे आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता म्हटले आहे की, जे लोक महिलेल्या चारित्र्यावर शंका व्यक्त करतात ते वैदिक परंपरा मानणारे आहेत. आंबेडकरांच्या या आरोपामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढे बोलतांना अॅड. आंबेडकर म्हणाले की, धनंजय मुंडेचा जीव शरद पवार नावाच्या पोपटामध्ये अडकलेला आहे. आंदोलन केल्याने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्या जाईल असे पवारांनी जाहिर केल्यास वंचित बहुजन आघाडी धनंजय मुंडेच्या विरोधात निश्चितपणे आंदोलन करणार आहे. राजकीय सोईनुसार नेत्यांचे राजीनामे घेतल्या जातात हा आजवरचा आमचा अनुभव आहे. शरद पवार यांच्या मनात धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याचे दिसत नाही. तिकडे मोदींनी ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलनाला दाबण्याचा करण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न शरद पवार धनंजय मुंडे प्रकरणात करीत असल्याचा आरोप यावेळी अॅड. आंबेडकरांनी केला आहे.
0 टिप्पण्या