२७ जानेवारीच्या आंदोलनामुळे देशाचा राजकीय अजेंडा बदलेल... - भास्कर भोजने

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

२७ जानेवारीच्या आंदोलनामुळे देशाचा राजकीय अजेंडा बदलेल... - भास्कर भोजने

Kisan Bagh Andolan will change the political agenda of the country ...



BhimPrakash.Com

कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांनी  राजकारणात नियोजनबद्ध पद्धतीने धार्मिकतेचा शिरकाव करीत लोकशाही धोक्यात आणली आहे. मुस्लिम तरुणांना अतिरेकी सिद्ध करण्यात आणि सिमी सारख्या विद्यार्थी संघटनांवर बंदी घालून तथा बाबरी मशीद आपल्याच कार्यकालात उद्ध्वस्त करून कॉंग्रेस पक्षाने आम्हीही मुस्लिम समुहाचे कट्टर विरोधक आहोत हेचं सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे १९९० च्या दशकांपासून हिंदू, हिंदुत्व आणि रामराज्य हा नारा देऊन आरएसएस आणि भाजपने  धर्माचा उघडं उघडं राजकारणात वापर सुरू केला त्यासाठी मूस्लिम समुदायाला टार्गेट करीत देशात हिंदू मुस्लिम ही दरी निर्माण केली आणि त्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. त्याचा परिणाम असा झाला की, देशातील मुस्लिम समुह एकांगी पडला, त्याला एकटं पाडण्यात कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचं हित सामावलेलं होतं.

 

मुस्लिम समुह एकांगी पडला तर भाजपला हिंदू मतांचं धृर्वीकरण करता येत होतं आणि हिंदुंची बहूसंख्य मते घेऊन सत्तेत जाता येते हा अजेंडा होता तर कॉंग्रेस पक्ष स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पासून मूस्लिम समुदायाला भयग्रस्त ठेऊन मते लाटतं आला आहे ही त्या दोन्ही पक्षांची राजकीय खेळी होती. तीस वर्षांच्या या राजकीय खेळीत एकटा पडलेला मुस्लिम समुह आत्मकेंद्रित बनला, तो रस्तावर ऊतरतो परंतु कुराणातील विटंबने बाबत, मुस्लिम अन्याया बाबत, मॉबलिचिंग बाबत, मश्जिद वरील हल्ल्याबाबत म्हणजेच आपल्या समस्येबाबत  इतरांच्या समस्येबाबत तो उदासीन आहे असा त्या समुहावर ठपका ठेवून त्याला वेगळं पाडण्याची प्रक्रिया इथं सातत्याने पार पाडली जाते आहे. अशाप्रकारे मानसिक आघात करीत करीत एखाद्या समुहाला अवनत गतीला पोहोचविले जाते याचे भारत देशातील प्राचिन इतिहासात अनेक दाखले सापडतात, वर्ण व्यवस्थेत, अवर्ण वा अस्पृश्य कसे निर्माण झाले तो इतिहास साक्षी आहे.

  

लोकशाही प्रधान आणि विविधतेत एकता सामावलेल्या आपल्या देशासाठी एखाद्या समुहाला एकांगी बनविणे हा अतिशय क्रुर प्रकार आहे नव्हे तो मानवतेवरील कुठाराघात होय. समाजाचे सामाजिक स्वाथ्य ऊत्तम राहिले तरच समाज विकास करु शकतो म्हणजेच राष्ट्र विकासाकडे झेप घेऊ शकते अन्यथा समाज दुभंग राहिला तर पूढच्या पिढ्या मानसिक विकृती जोपासतात आणि मग देशाच्या प्रगती ऐवजी अधोगतीच होते हा समाजशास्त्रीय अभ्यास आहे. तीस  वर्षांपासून जाणिवपूर्वक समाजाच्या विघटनावर भर देतं लोकशाही संपवून इथं हिटलरशाही रुजू झाली आहे, म्हणून लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, राष्ट्रहित आणि समाजहित लक्षात घेऊन समाजाचे सामाजिक मनोमिलन घडवून आणण्यासाठी वंचित बहूजन आघाडीने समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून २७ जानेवारीच्या आंदोलनांची आखणी केली आहे.

 

२७ जानेवारीला वंचित बहूजन आघाडीच्या बॅनरखाली शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर "किसान बाग" हे शाहिन बाग च्या धर्तीवर आंदोलन करणार आहेत आणि शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविणार आहेत. मुस्लिम समुहातील ऊर्जा सर्वच देशबांधवांसाठी कामी येणारी आहे हा सकारात्मक संदेश या "किसान बाग" आंदोलनातून देशातील जनतेला द्यायचा आहे म्हणून हे आंदोलन ऐतिहासिक आहे. वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी, देशातील ऊद्याच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि सामाजिक मनोमिलनाची दिशा ठरविण्यासाठी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने आंदोलन आयोजित केले आहे. शेतकरी आंदोलन हे मुठभर भांडवलदारांच्या गुलामगिरी विरोधातील आंदोलन आहे म्हणून "किसान बाग" आंदोलन हे वैचारिक पातळीवर बहूआयामी आंदोलन आहे हेही समजून घ्यावे. या आंदोलनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि भावी पिढ्यांसाठीची गरज लक्षात घेऊन या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी सर्वच लोकशाहीवादी, मानवतावादी आणि राष्ट्रप्रेमी जनतेने सहभाग नोंदवावा, ही नम्र विनंती...!


भास्कर भोजने, अकोला
मो. नं. 9960241375

(लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या