औरंगाबाद येथे आदिवासी समाजाचा महामेळावा ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

औरंगाबाद येथे आदिवासी समाजाचा महामेळावा ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती



Social24Network

औरंगाबाद(प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी औरंगाबादेत होणाऱ्या आदिवासी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. असून यासंदर्भात आज सुभेदारी विश्राम गृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विवीध समित्यांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रिंट मीडिया तथा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई यांनी दिली.


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद १७ फेब्रुवारी रोजी आदिवासी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या मेळाव्याची तयारी पक्षाच्या वतीने जोरदार सुरू आहे. मेळाव्याला अद्याप वेळ असला तरी स्वतः प्रकाश आंबेडकर हे जातीने लक्ष घालत आहे.

 

यावेळी पक्षाचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ, पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा नेते सतीश गायकवाड, प्रवीण हिवाळे, पि. के. दाभाडे, अशोक गवई, शैलेंद्र मिसाळ, अँड. संतोष लोखंडे, ज्येष्ठ सदस्य श्रीरंग ससाने, अशोक खिल्लारे, हरिदास बोर्डे, प्रदीप धनेधर, जयप्रकाश शिंत्रे, महिला जिल्हाध्यक्ष अँड. लता बामणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या