धर्मांध शक्तीचे दंगलीचे मनसुभे उधळुन लावा - पॅंथर दीपक केदार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

धर्मांध शक्तीचे दंगलीचे मनसुभे उधळुन लावा - पॅंथर दीपक केदार

Social24Network

कोरोनामुळे सद्या महाराष्ट्र अपंगावस्थेत आहे. या महाराष्ट्रातील कामगार, शेतकरी, शेतमजुर प्रचंड बेरोजगारीच्या बोजाखाली दबलेला आहे. या भिषण परिस्थितीमध्ये आरएसएस/भाजपाचे सरकार जनतेला धर्माच्या नावाखाली दंगली घडविण्यासाठी भडकविण्याचे काम करीत आहे. आज जनतेला दंगलीची नाही तर भाकरीची गरज आहे म्हणुन बहुजन समाजाने बीजेपी/आरएसएसचे धर्मांध शक्तीचे दंगलीचे मनसुभे उधळुन लावले पाहिजे, असे आवाहन ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केले आहे. 


" सोशल 24 नेटवर्क"शी बोलतांना ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार म्हणाले की, भीमाकोरेगाव दंगलीनंतर 35000 बौद्ध तरुणांवर गुन्हे दाखल करण्याचा, कोंबिंग करून आंबेडकरी वस्त्यामध्ये रक्तबंबाळ क्रांती करण्याचा विचार हा सडलेल्या डोक्यातूनच आलेला होता. निर्दयता जिथे येते तिथे सडलेला विचार येतो. बौद्ध तरुणांवर विद्यार्थ्यांवर 307 चे गुन्हे दाखल करून पोलिसांना हाताशी धरून जी रक्तरंजित कोंबिंग केली तो काय विचार होता हे फडनवीसांनी सांगावं. एवढ्या तरुणांनाचे आयुष्य उद्धवस्त करून फडणवीस सर्वसामान्य नॉर्मल आयुष्य जगतात कसे हा प्रश्न आहे. त्यांना हे जमतं कसं हा आमचा प्रश्न आहे. माझ्या बागेतला आंबा खाल्ला की मुलगा होतो म्हणणाऱ्या संभाजी भिडेचा तो आंबा तरी चौकशीसाठी मागवला का? आणि हा कोणता विचार होता? बौद्ध बहुजनांवर हल्ला करणाऱ्या भिडेला पाठीशी घालणे हा कोणत्या मेंदूतून आलेला विचार होता? हिंदीत बाईट देणारे फडणवीस मनीषा वाल्मिकी हत्याकांडावेळी कुठे होते? उत्तरप्रदेशात नराधम पुजारी हे महिलेवर बलात्कार करतात तिच्या गुप्तांगात रॉड टाकून मारून टाकतात तेंव्हा फडणवीस बाईट ट्विट का करत नाही? आशिफा हत्याकांड माहीत आहे की नाही? 


पुलवामा येते 40 जवान 2 दिवसाने शहीद होणार हे 2 दिवस आधी माहीत असणारा अर्णब गोस्वामी गप्प कसा काय बसला? सांगा हा विचार सडलेला नाही तर काय आहे? हेमंत करकरे, साळसकर, कामटे यांची थट्टा करणाऱ्या कंगणाची बाजू घेणे हा विचार कसला? शेतकऱ्यांचा जालियनवाला बाग हत्याकांड केलंय त्यावर फडणवीस का बोलत नाही? प्रत्येकवेळी सांस्कृतिक कार्यक्रमांना, आधुनिक विचारांना धर्माचा रंग देऊन उन्माद घडवायचा ही आरएसएसची फॅशन झाली आहे. आत्मपरीक्षण करण्याची सवय नसल्यामुळे केवळ लादणे हाच एककलमी हिंदुत्वाचा कार्यक्रम आहे. आता सत्तेसाठी फडणवीस नव्या दंगलीच्या तयारीत आहेत का? हिंदू भडकावून दंगली घडवायच्या आहेत का? धार्मिक दंगल हाच आहे का आपल्या सत्तेचा महामार्ग? आरएसएस पुन्हा एकदा दंगलीच्या तयारीत दिसत आहे.


मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तात्काळ भिडेला अटक करून तात्कालीन सरकारने भिडेला कशी मदत केली याचा खुलासा करून तत्कालीन मुख्यमंत्री-गृहमंत्री यांना सुद्धा बेड्या ठोक्याव्यात! फडनविसजी, कोरोनानंतर महाराष्ट्र हा अपंग अवस्थेत आहे. कामगार भूमीहीनमजूर अफाट बेरोजगार असा अवस्थेत आहे. आज दंगली नाही भाकरीची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही धर्मांध शक्तीचे दंगलीचे मनसुभे उधळून लाऊ. सडलेले सोडा तुम्ही तर सगळेच बिघडलेले आहात, अशी टीका यावेळी केदार यांनी केली आहे. 


आणखी महत्त्वाचे...

धर्मरक्षकांचा नारीभक्षक धर्म संपविला पाहिजे - पॅंथर दीपक केदार

जयंतरावांनी राष्ट्रवादीचा जातीयवादी चेहरा समोर आणला ; महापुरूषांच्या अपमानावरून पॅंथर दीपक केदार आक्रमक

.. तर सरकारने राज्यकारभार सोडून अधिकृत ‘‘तमाशा फड’’ चालवावा ; पॅंथर दीपक केदार यांची खोचक टीका

नितीन राऊत "जयभीम"च्या घोषणेला जागा ; पॅंथर दीपक केदार

...अन्यथा मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवरील सुरक्षा वाढवायला सुरवात करावी ; पॅंथर दीपक केदार यांचा आक्रमक इशारा

भारत दुनिया भर में "बलात्कारियों की भूमि" के रूप में जाना जा रहा है ; पैंथर दीपक केदार








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या