डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन "जागतिक विद्यार्थी दिन" म्हणून साजरा व्हावा - भन्ते अश्वजीत

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन "जागतिक विद्यार्थी दिन" म्हणून साजरा व्हावा - भन्ते अश्वजीत

 

Dr. Babasaheb Ambedkar School Admission Day should be celebrated as World Student Day - Bhante Ashwajit (photo credit google)

Dr. Babasaheb Ambedkar School Admission Day should be celebrated as World Student Day - Bhante Ashwajit

Social24Network 

दै. वृत्तरत्न सम्राटमध्ये दि. ४ नोव्हेंबर २०२० रोजी तिसर्‍या पानावर एक बातमी वाचनात आली. बातमीचे शीर्षक आहे "विद्यार्थी दिवस" लाखो स्मरणपत्रे पाठविणार प्रधानमंत्री, राष्ट्रपतींना रक्ताने लिहिणार पत्रे... आणि त्याखाली मजकूर असा आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रारंभ झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे इयत्ता पहिली मध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन 'विद्यार्थी दिवस' म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयातून शासनस्तरावर साजरा व्हावा यासाठी १५ वर्षे महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला. या आग्रहाला दाद देत सरकारने तीन वर्षापूर्वी विद्यार्थी दिवस घोषित केला. आता हा विद्यार्थी दिवस भारतभर होण्यासाठी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी यासंबंधी अधिकृत घोषणा करावी. यासाठी राज्यभरातून १ लाख २० हजार पत्रे दिल्लीला पाठविणार असून काही पत्रे रक्ताने लिहिणार असल्याचे विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी स्पष्ट केले.

खरे तर इथे मुद्दा असा आहे भारत घडविण्यासाठी जन्म घेतलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर! शिक्षणाची एकही संधी न सोडणारे विद्यार्थी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! तारापूरवाला बुक सेलर्स कडून नवनवीन पुस्तके उधारीवर घेतल्यामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी १९३६ साली आपले चारमिनार इमारत विकणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! जगातील सर्वश्रेष्ठ घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर! कोलंबिया विद्यापीठाने 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' म्हणून गौरवलेले नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! अशा महान व्यक्तीने शिक्षणासाठी पहिले पाऊल ज्यादिवशी शाळेत टाकले तो दिवस विद्यार्थी दिन म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारला काय अडचण आहे. अशी महान व्यक्ती; की ज्या महान व्यक्तीचा जगभरात गौरव सुरू आहे. जगभरात अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे उभारले जात असतांना त्यांच्या अथांग ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी जगभरातील धडपडणारे विद्यार्थी असतांना हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून का साजरा होऊ नये? 

यासंदर्भात एक गोष्ट इथे सांगण्यासारखी आहे ती ही की इंग्लंडमधील सिडनहॅम कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दर्शनी भागात आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री इंग्लंड मध्ये गेले असतांना त्यांनी तो पुतळा पहिला. आणि ते सरळ त्या कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथल्या प्रिन्सिपालांना त्यांनी उपरोधाने म्हटले की," तुमच्या इंग्लंडमध्ये लोकांची काय कमी आहे? की, तुम्ही भारतातील या हलक्या जातीचा माणसाचा पुतळा येथे बसवला?" त्यावर त्या प्रिन्सिपालांनी फार शांततेने त्यांना उत्तर दिले ते म्हणाले," साहेब या कॉलेजमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी यांच्यासारखा शिकला पाहिजे यासाठी तो पुतळा इथे बसलेला आहे. तो कोणत्या जातीचा आहे हलक्या जातीचा आहे की वरच्या जातीच्या आम्हाला काही माहीत नाही? परंतु त्या  विद्यार्थ्याने या कॉलेजचं नाव जगात अजरामर करून टाकलं!" प्रिन्सिपल साहेबांनी जे उत्तर दिलं त्या ऐकल्यावर त्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होता. सांगण्याचं तात्पर्य हे आहे इतक्या सगळ्या गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत सकारात्मक असतांना भारतामध्ये त्यांचा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात काही अडचण आहे, काय हरकत आहे. यासाठी अशा मागण्यांची आवश्यकताच नाही कारण भारताची घडी बसवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आजही त्यांच्या तत्वावर भारत देश खऱ्या अर्थाने चालत आहे.

प्र. के.अत्रे आपल्या 'दलितांचे बाबा' या पुस्तकात लिहितात डॉ. आंबेडकरांएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीय माणूस आज आम्हाला दिसत नाही!  वाचन, चिंतन आणि लेखन याखेरीज आंबेडकरांना दुसरे जीवनच राहिलेले नाही! ज्या ज्या विद्वानांना आपल्या व्यवसायाचा आणि व्यासंगाचा अभिमान वाटत असेल, त्यांनी ज्ञानाचे अग्निहोत्र आपल्या प्रचंड ग्रंथालयात अहर्निश पेटवून बसलेल्या ज्ञानयोग्याचे एकवार दर्शन घ्यावे म्हणजे त्यांचा तो वृथा अभिमान तेथल्या तेथे जिरून जाईल! महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने व्यासंग आणि आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आणि पवित्र असा ब्राह्मण आहे! एवढेच नव्हे तर 'ब्रम्हर्षी' या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. ज्या कोणा सनातनी ब्राह्मणांना आपल्या जन्मजात ब्राह्मण्यांची घमेंड असेल त्यांनी या कर्मजात 'ब्राह्मणा'च्या घरात जाऊन त्याचे शुचिर्भूत, सोज्ज्वळ आणि ज्ञानमय जीवन पाहावे, म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तो बाहेर पडला तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू! आतापर्यंत आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ पाहिले आणि पुढे लिहिणार असलेले ग्रंथ विचारात घेतले, म्हणजे त्याची विशाल विद्वत्ता बघून कोणीहि थक्क झाल्यावाचून राहणार नाही! धर्मशास्त्रापासून घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नाही की, ज्यामध्ये त्यांची प्रतिभा लीलेने विहार करू शकत नाही. गहन विषयाचे संशोधन करण्याचा त्यांचा हव्यास तर कोशकार केतकर आणि इतिहासाचार्य राजवाडे यांच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा आहे. आंबेडकरांच्या विद्वत्तेचा आणि व्यासंगाचे  प्रतिबिंब धार्मिक आणि राजकीय विचारसरणी मध्ये पूर्णपणे पडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या उच्चाराला आणि विचाराला एक प्रकारचा भारदस्त वजनदारपणा प्राप्त झाला आहे. मूळच्या त्यांच्या बंडखोर स्वभावात सतत अभ्यासाने प्राप्त झालेल्या खंबीर आत्मविश्वासाची भर पडल्याने, त्यांच्या भाषणात आणि लेखनांत एक प्रकारची बेदरकार निर्भयता निर्माण झाली आहे.

त्यांच्या विद्वत्तेच्या संबंधाने इथे दुसरी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे पहिल्या जागतिक युद्धानंतर आर्थिक गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे भारतीय स्थिर चलन पद्धती ठरविण्यासाठी रॉयल कमिशन २५ डिसेंबर १९२५ रोजी भारतात आले. त्या कमिशनपुढे साक्ष देण्यासाठी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एकमेव जागतिक किर्तीचे विद्वान होते. आणि त्यांनीच त्या कमिशनच्या हजारो प्रश्नांना सडेतोड व समर्थपणे उत्तरेही दिली. त्यांनी दिलेल्या साक्षीमुळे आज देशाची चलन पद्धती अस्तित्वात आहे ती केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना १ अप्रील १९३५ रोजी ब्रिटिश राजवटीत झाली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या 'दी प्रॉब्लेम ऑफ दी रुपी' या ग्रंथाचा आधार घेऊन सदर बँकेचे रूल्स अँड रेग्युलेशन ठरविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रिजर्व बँकेच्या स्थापण्याच्या संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान आहे. रिझर्व बँक एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे. जी भारतात चलन विषयक नियमावली आणि आर्थिक नीती वर नियंत्रण ठेवते. तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण व महत्त्वाचे निर्णय घेते. 

शेवटी असे म्हणावेसे वाटते एक विद्यार्थी म्हणून एवढ्या मोठ्या डिग्र्या प्राप्त करणारा भारतात त्यांच्यासारखा दुसरा विद्यार्थी आजपर्यंत झाला नाही. त्याच प्रमाणे मुंबईतील दादर येथे राजगृह नावाचे घर केवळ पुस्तकांसाठी बांधणारा विद्यार्थीसुद्धा या देशात आणि जगात झाला नाही. अशा विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्यात का येऊ नये? तेव्हा केंद्र सरकारने यावर निश्चित चिंतन म्हणून करावे आणि कृती करावी. ज्यांनी ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिले त्या तमाम विद्यार्थी वर्गाचे अशी मागणी आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन हा 'विद्यार्थी दिवस' म्हणून भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात साजरा व्हावा!

Dr. Babasaheb Ambedkar School Admission Day should be celebrated as World Student Day - Bhante Ashwajit


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या