दिवाळी बौद्धांचा सण नाही! - भन्ते अश्वजीत || Diwali is not a Buddhist festival! - Bhante Ashwajit

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दिवाळी बौद्धांचा सण नाही! - भन्ते अश्वजीत || Diwali is not a Buddhist festival! - Bhante Ashwajit

Diwali is not a Buddhist festival! - says Ashwajit



Social24Network 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आम्हाला जागतिक बुद्ध धम्म दिला. आणि १५ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी दोन तास भाषण दिले. त्या भाषणात ते एका ठिकाणी म्हणतात 'नरकातून सुटलो !' तर बाबासाहेबांनी आम्हाला हिंदु धर्म नावाच्या नरकातून बाहेर काढले आणि पवित्र अशा बुध्द धम्म नावाच्या स्वर्गात आणले. तेंव्हापासून आमचा चेहरा मोहराच बदलला. पहिली गोष्ट म्हणजे आमची ओळख बदलली. पुर्वी महार म्हणून सांगतांना आम्हाला घृणा वाटत होती आणि स्वतः विषयी तिरस्कार वाटत होता. आता बौध्द म्हणून सांगतांना आम्हाला अभिमान वाटतो. कारण बौध्दांचा इतिहास हा गौरवशाली आहे. आणि बुध्द धम्म हा संपुर्ण विश्वात सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच आता बौध्द म्हणून पाहतांना इतरांच्या दृष्टीकोनात बदल जाणवतो. जशी आमची ओळख बदलली तसेच आमच्या नावात सुध्दा परिवर्तन झाले. इतरांना तुच्छ वाटतील अशीच आमच्या पुर्वजांची नावे होती. चिंध्या, बोध्या, दगडया, नथ्या, कचऱ्या, सुऱ्या, धोंडया, पुंज्या इत्यादी आता मात्र धम्मरत्न, धम्मबोधि, बुध्दपाल, विनयपाल, अश्वजित, रत्नदिप, विश्वजित, प्रेमानंद, अमरदिप, हर्षवर्धन, जयशील अशी मुलांची तर मुलींमध्ये पंचशीला, श्रावस्ती, विदिशा, दीक्षा, अनुमती, पुनम, पुष्पलता, रत्नमाला, सुजाता, विशाखा अशी सुंदर नावे आहेत. धम्मक्रांतीने आमच्यात झालेला हा दुसरा बदल होय. Diwali is not a Buddhist festival! - Bhante Ashwajit

१४ ऑक्टोबर १९५६ च्या अगोदर आमच्या वस्त्यांची नावे महारवाडा, मांगवाडा या पलिकडे नव्हती. आज मात्र आमच्या वस्त्यांची नावे एकतानगर, समतानगर, आदर्शनगर, भीमनगर, दीक्षानगर,शांतीनगर, भीमवाडी अशी धम्माशी निगडीत असणारी नावे आहेत. १९५६ च्या अगोदर आम्हाला राहायला घरेच नव्हती मोडकी तोडकी झोपडी असायची ती ही गावाबाहेर. आज गावाच्या किंवा शहराच्या मध्यभागी आमच्या इमारती उभ्या असून त्यांची नांवे सुध्दा राजगृह, तथागत अपार्टमेंट, रमाई निवास अशी नावे आहेत. त्याचप्रमाणे आमच्या शहरांची, रस्त्यांची नावे सुध्दा अस्तित्वात आली. म्हणजे एकंदरीत १९५६ नंतर आम्ही पार बदलून गेलो आमचे राहणीमान बदलले, आमचे खाणे पिणे बदलले, आमचे कपडे दलले, आमचे अभिवादन बदलले, आमचे साहित्य बदलले, आमच्यात राजकीय बदल झाला. पुर्वी आम्हाला शिक्षण घेण्याचा हक्कच नव्हता आज मात्र शैक्षणिक क्षेत्रात बौध्द समाजाने अशी भरारी मारली की, कोणतेही क्षेत्र बाकी नाही की, ज्यात बौध्दांचा समावेश नाही. अधिकारी, शास्त्रज्ञ, वैमानिक, डॉक्टर अशी सर्व क्षेत्र दोमयानी आपल्या बौद्धिक कौशल्याने काबीज करून घेतली. त्याच प्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे सण सुद्धा बदलले. Diwali is not a Buddhist festival! - Bhante Ashwajit  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्यावेळेस २२ प्रतिज्ञा सुद्धा दिल्या होत्या. त्यातील १९ वी प्रतिज्ञा अशी आहे की, "माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो!" तर इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही कि, आम्ही हिंदू धर्मांचा, त्यांच्या रूढी परंपरेचा, त्यांच्या सणांचा, त्यांच्या संस्काराचा अश्या सर्वांचा त्याग करीत आहोत. अशी ती प्रतिज्ञा आहे. त्यानुसार दिवाळी हा सण बौद्धांचा नसून वैशांचा सण आहे. प्रत्येक पौर्णिमा, प्रत्येक अष्टमी, प्रत्येक अमावस्येचा आदला दिवस, १४ एप्रिल आणि धम्मदीक्षा दिन हे सहा सण फक्त बौद्धांचे आहेत. बाकी सर्व सण हिंदूंचे आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या सणांचा त्याग केला पाहिजे. दिवाळी म्हणजे हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण आहे. जो सबंध भारतात मान्यता पावलेला आहे. जो या देशातील कोणत्याही धर्माची व्यक्ती कोणत्याही प्रकारची चिकित्सा न करता साजरा करतो. हा सण साजरा केल्याने वरवरचा आनंद जरी मिळत असला तरी या सणामुळे बहुजनांचे खिसे खाली होतात आणि दिवाळी मात्र ब्राह्मणी भांडवलदारांची होते.  Diwali is not a Buddhist festival! - Bhante Ashwajit

हिंदू संस्कृतीचे दिवाळी साजरी करण्याचे काही कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे रामाने रावणाचा पराभव केल्यानंतर राम अयोध्येला परतत असतांना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केले. दुसरे कारण आहे श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा आहे. तिसरे कारण आहे देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला त्यांचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता. तेव्हा भगवान शंकराने स्वतः देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून क्ष्मीची पूजा केली जाते. हिंदूंचे ही कारणे बुद्धीच्या व विज्ञानाच्या कसोटीवर कधीच खरी उतरू शकत नाहीत आणि तपासलीही जाऊ शकत नाही. परंतु त्या कारणांची मीमांसा न करता वैदिकांचे सर्वच लादलेले सण बहुजन समाज आजवर सर्रासपणे साजरा करीत आला आहे. त्यामुळे ब्राम्हणांचे षड्यंत्र लपून राहण्यास मदत झाली. आता आपण पाहू बौद्धांनी दिवाळी साजरी का करू नये?  Diwali is not a Buddhist festival! - Bhante Ashwajit

तथागत भगवान बुद्धांच्या श्रावक संघाचे दोन श्रेष्ठ सोबती सारीपुत्त सेनापती आणि महामोग्गलायन हे उपसेनापती होते. या दोघांचा असीम त्याग आणि ४४ वर्षाची धम्मसेवा आणि त्यांच्या अंगी असलेले सद्गुण यामुळेच तथागतांनी त्यांच्यावर संघाची धुरा सोपविली होती. महामोग्गलायनचा प्रभाव राजगृहामध्ये खूप वाढला. त्यामुळेच कार्तिक अमावास्येला ईसीगल पर्वतावर त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. महामोग्गलायनला जिवंत जाळण्यात आले. तो दिवस दिवाळीचा होता. मौर्य काळातील दहावा सम्राट बौद्ध राजा बृह्दरथ हा दहा व्यक्तींचे बळ असलेला महापराक्रमी अजिंक्य योद्धा होता. युद्धात त्याला हरविणे कठीण काम होते. यांची ब्राम्हणी सेनापती पुष्यमित्र शुंग याने कपट कारस्थानाने क्रूर हत्या केली. तोही दिवस कार्तिक अमावस्येचा होता. बौद्ध सत्ता उलथून लावण्यात आली. भिक्खुंच्या कत्तली करण्यात आल्या. भिक्खुंचे शीर कापून आणणाऱ्यास १०० सुवर्ण मुद्रा देण्याचे फर्मान पुष्यमित्र शुंग याने सोडले. विहारे, स्तूप नष्ट केली आणि दिव्यांच्या माळा लावून आतिषबाजी केली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा अर्थात दिवाळीचा होता.  Diwali is not a Buddhist festival! - Bhante Ashwajit 

तिसरी सर्वात मोठी घटना म्हणजे "ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो" हि म्हण आजही आपल्या माता-भगिनी एखाद्या प्रिय व्यक्तीला ओवाळतांना म्हणतात. यामागे फार मोठा इतिहास आहे. बहुजनांचा सर्वश्रेष्ठ राजा बळी हा अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिमान, सत्वशील, चारित्र्यवान, उदार, दयाशील, न्यायी असा सर्वगुण संपन्न राजा होता. त्याच्या राज्यात सर्वसामान्य बहुजन समाजातील जनता अत्यंत सुखी-संपन्न व समृद्ध होती. अशा या दानशूर बहुजन राजाला विष्णूने कपटकारस्थान रचून कैद केले. त्यांची सत्ता, शास्त्रे, विद्या, संपत्ती हिरावून घेण्यात आली. त्यांच्या मुलांना एकामागून एक ठार करण्यात आले. बलीप्रतीपदा या दिवशी बळी राजाची क्रूर हत्या करण्यात आली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा म्हणजेच दिवाळीचा होता. म्हणून बौद्धांनी, बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये. आजवर आपण जे काही करत आलो त्यात आपले अज्ञान होते. परंतु आता तर आपल्याला खरा इतिहास समजलेला आहे आणि हा खरा इतिहास समजून देखील आपण जर परत तीच चूक करत असाल तर मात्र आपल्याला बौद्ध म्हणवून घेण्याचा काही एक अधिकार नाही. Diwali is not a Buddhist festival! - Bhante Ashwajit  

जर आपण त्या २२ प्रतीज्ञांचे पालन करत नाहीत तर याचा अर्थ स्पष्ट आहे कि आपण आपल्या उद्धारकर्त्याशी बेईमानी करत आहोत. त्यांचा अपमान करत आहोत व आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करत आहोत. म्हणून बौद्धांनी, बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये. घरावर विद्युत रोषणाई करणे, आकाश कंदिल लावणे, दिवे लावणे, रांगोळी काढणे, म्हणजे आपल्या पूर्वजांच्या, महापुरुषांच्या हत्येचा आनंदोत्सव साजरा केल्यासारखे होईल. आपण बौद्ध आहोत. आपली संस्कृती वेगळी आहे.  Diwali is not a Buddhist festival! - Bhante Ashwajit


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!




टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

Uttam म्हणाले…
समजावून सांगण्याची पद्धत छान आहे साधु साधु साधु
sujay म्हणाले…
खुप छान ऐतिहासिक माहिती मिळाली. साधू साधू साधू !