डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धर्म प्यारा होता! - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धर्म प्यारा होता! - भन्ते अश्वजित

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या झाडून पुसून सर्व पुढायांचे व नेत्यांचे धर्माकडे अजिबात लक्ष नसून जो तो राजकारण खेळण्यात गुंग झाला आहे. त्याचमुळे धर्म अधोगतीला जातो की काय? अशी भिती निर्माण झाली आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी आपल्या कार्यकर्त्यांना धर्माबाबत सजक राहण्याचा उपदेश केलेला आहे. तरीही धर्माचे काही घेणेदेणे नाही असाच जणू हा वर्ग आजही वागत आहे. या संदर्भात डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकरांनी दि. १५/१०/१९५६ रोजी नागपूरच्या शाम हॉटेलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेले भाषण फारच मोलाचे असून सर्व नेत्यांनी अगदी आजपासून जरी त्या भाषणाच्या विचार करून वागण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने जयंती साजरी झाल्याचा आनंद तमाम बौद्ध धर्मियांना झाल्याशिवाय राहणार नाही.



डाॅ. बाबासाहेब आंबेडकर



मध्य प्रदेश दलित फेडरेशन शाखेच्यावतीने दि. १५/१०/१९५६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ नागपूर येथील शाम हॉटेलमध्ये छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सौ. माईसाहेब, बॅ. खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड, आवळे बाबू, गोंडाणे, जी. टी. परमार (गुजराथ), ए. जी. पवार, आर. डी. भंडारे, बी. सी. कांबळे इत्यादींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी आपल्या भाषणात बोलताना बाबासाहेब म्हणाले की, “या ठिकाणी मला भाषण करावे लागेल याची कल्पना नव्हती. तशी कल्पना असती तर माझे विचार संकलित करून मांडणे सोईचे झाले असते." एकंदर मला असे दिसते की, तुम्हाला राजकारण फार प्यारे आहे.



कोणत्याही गोष्टीपेक्षा राजकारणाची तुम्हाला अधिक आवड दिसते. माझे तसे नाही. मला धर्म जास्त प्यारा आहे आणि त्यासाठीच मी माझी शक्ती वेचणार तुम्हाला काही खास अधिकार मिळवून देण्यासाठी मी गांधीशी झगडा केला, काँग्रेसशी सामना दिला. त्यावेळी प्रथमच त्यावेळच्या मुंबई असेंब्लीत १५-१६ आमचे लोक निवडून आले. असेंब्लीत सरकारविरोधी पक्ष म्हणून आम्ही काम केले, ते एवढे वाखाणण्यासारखे होते की, असेंब्लीमधील आदर्श विरोध म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री श्री. खेर यांना उद्गार काढावे लागले. त्या काळानंतर लढाई आली. लढाईच्या काळात काही विशेष करता आले नाही. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर राज्य घटना घडविली. त्यावेळी आपल्या राखीव अधिकाराचा विचार झाला. काँग्रेसवाल्यांना राखीव जागांकरिता सवता मतदार संघ मान्य नव्हता. तेव्हा जे वारे वाहत होते ते संयुक्त मतदारसंघाचे होते. त्याचाही प्रयोग करून पहावा, असे पुष्कळांना वाटले. चोराची लंगोटी देखील सोडू नये म्हणतात. त्याप्रमाणे राखीव जागा सोडून देता, त्यांचा संयुक्त मतदार संघाने प्रयोग करावा असे वाटले. पण आता असा अनुभव येऊन चुकला की, काँग्रेसच्या तिकिटावर राखीव जागेवर जी माणसे येतात ती आपली तोंडे बंद करून बसतात. अशा त-हेने संयुक्त मतदार संघामुळे जर गधे लोक निवडून येत असतील तर निवडणूकांचा व जागांचा उपयोग तरी काय? त्याचा काही उपयोग होत नाही हे अनुभवाने आता सिद्ध झाले आहे. 



राखीव जागा नकोत, म्हणून फेडरेशनने ठराव केला आहे. त्या ठरावास मी चिकटून राहू इच्छितो. त्या ठरावापासून ढळण्याची माझी इच्छा नाही. राखीव जागा १० वर्षांसाठी आहेत त्या जागा आता या निवडणूकानंतर राहणार नाहीत. आपल्या समाजाचे ऐक्य ही कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट आहे. या राखीव जागा गौण आहेत. आपल्या आजपर्यंतच्या फेडरेशनच्या चळवळीने स्वाभीमान अवश्य निर्माण केला, ही गोष्ट फेडरेशनला भुषणावह आहे. त्यामुळे संघटना झाली तथापि त्यामुळे एक प्रकारची तटबंदीही निर्माण झाली. दुसरे लोक आम्हाला मतं देत नाहीत व आपण लोक त्यांना मत देत नाही ही एक प्रकारची तटबंदीच होय. दुर्दैवाने आपली लोकसंख्या कमी आहे. आपण केवळ अल्पसंख्यांक आहोत. अशा परिस्थितीत फेडरेशन आहे. त्या स्थितीत ठेवणे कठीण आहे. याचसाठी इतर समाजातील आमचे दु:ख जाणणारे कोण आहेत हे पाहिले पाहिजे अशा सर्वांना आपण एकत्रित करून त्यांच्यासह जाण्याची आपली सिद्धता पाहिजे. 



अशा लोकांना एकत्रीत करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तो प्रयत्न यशस्व झाल्यास आपल्याला नवीन पक्ष स्थापावा लागेल व त्या पक्षात आपल्याशिवाय इतरांनाही द्वार मोकळे राहील. तुमच्यातच नव्हे तर या देशात एक विचित्र विकृती दिसून येत आहे. ती ही की, आज झाड लावले की, त्यास दुसऱ्याच दिवशी फळ आले पाहिजे. राजकारणात अशी अपेक्षा धरणे चुक आहे. आता इंग्लंडमधील राजकारणाचे उदाहरण घेऊया. तेथील ब्रिटीश मजूर पक्षाचा इतिहास काय सांगतो? १८९० साली त्यांचे फक्त दोन लोक पार्लमेंटमध्ये निवडून आले. 



१९०६ साली त्यांना सुमारे १४ जागा मिळाल्या १९२४ पर्यंत त्यांना विशेष यश नव्हते. त्या साली मात्र त्यांचे १२५ लोक निवडून तो खरा विरोधी पक्ष बनला. म्हणून आता इतर समाजाच्या सर्व लोकांबरोबर काम करावयास तुम्ही शिकले पाहिजे. तुमच्यात तुम्ही फुट ठेऊन चालणार नाही. माझ्या दबदब्यामुळे अजून काही वेडेवाकडे घडत नाही. मी तुम्हासाठी कोठपर्यंत राहणार? आता उमेदवार निवडण्याचे काम लोकांनीच केले पाहिजे. त्यांच्या अडीअडचणींना तुमच्या ताकदीप्रमाणे वाचा फोडली पाहिजे. त्यांच्या सुख दुःखाशी समरस होण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचे राजकीय जीवन कार्यक्रम चालवावा यापेक्षा अधिक काही सांगणे आपणास इष्ट वाटत नाही.


सर्वांचे मंगल हो!




भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या