मैत्री भावना - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मैत्री भावना - भन्ते अश्वजित


डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या पवित्र ग्रंथामध्ये दुसऱ्या खंडात, आठव्या भागातील, चवथ्या प्रकरणात "धम्मदीक्षेची जोखीम" या प्रकरणामध्ये तथागत बुद्ध शिकार करून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना मैत्रिभावनेचा उपदेश करून त्यांना संघात सामील करून घेतात. मैत्रिभावना कशी जोपासावी याबद्दल तथागत बुद्ध त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात. या मैत्रिभावनेचे चार अंग पुढील प्रमाणे...


मैत्री भावना - सर्व प्राणी मात्रांविषयी आत्यंतिक व निस्सीम प्रेम उत्पन्न करणा-या गुणास मैत्री म्हणतात. ज्याच्यात तृष्णारहित, कुशल-चित्त असते तीच यथार्थता मैत्री होय. मैत्रीभावनेचा अभ्यास करणाराने एकान्त ठिकाणी बसून व द्वेष भावनेचा संपूर्ण त्याग करुन प्रथमतः स्वतःवर मैत्रीभावनेचा अभ्यास प्रारंभ करावा, यासाठी ‘मी वैर रहित आहे, द्वेषरहित आहे, उपद्रवरहित आहे, सुखपूर्वक राहत आहे अशी नेहमी भावना करावी. त्यानंतर क्रमाक्रमाने प्रिय व्यक्तीवर, मध्यस्थावर आणि शत्रूवर मैत्री भावना करुन तेही वैररहित, द्वोषरहित, उपद्रवरहित होऊन सुखाने राहोत असा नेहमी अभ्यास करावा. शत्रूवर मैत्री-भावना करुन तेही वैररहित, दोषरहित, उपद्रवरहित होऊन सुखाने राहोत असा नेहमी अभ्यास करावा. शत्रूवर मैत्रीभावनेचा अभ्यास करताना मनात द्वेष जागृत होत असेल तर भगवान बुद्धाच्या उपदेशाचे वारंवार चिंतन करुन द्वेषाला बाजूस सारण्याचा प्रयत्न करावा. असा हा अभ्यास करुन आपण स्वतः आपली प्रिय व्यक्ती मध्यस्थ व शत्रू या चार मधील सीमाभेद नष्ट करावा. त्याचे सुख-दु:ख समान आहे असे पाहण्याचा अभ्यास करावा. अशा अभ्यासाने सीमाभेद नष्ट होऊन साधकाला ते निमित्त प्राप्त होते. उपचार समाधी प्राप्त होते. त्यानंतर त्याच निमित्तावर चित्त लाऊन ते निमित्त वृद्धिंगत करुन साधकाला पृथ्वी मार्ग कसिण सांगितल्याप्रमाणे अर्पण समाधीचे मैत्री सहगत प्रथम ध्यान क्रमाक्रमाने द्वितीय, तृतीय ध्यान प्राप्त होते. मैत्रीभावना वृद्धींगत करण्याची ही रीत आहे. सर्व स्त्रिया, सर्वपुरुष, सर्वश्रेष्ठ, सर्व कनिष्ठ, सज्जन, सर्वमानव व दुर्गतीला गेलेले सर्व प्राणी, सर्व व्यक्ती, सर्व देह धारी या पाच आकारानुसार केलेल्या अभ्यासाला सीमा रहीत मैत्री असे म्हणतात. या बारा आकारातील एकेक आकार घेऊन तो पूर्व दिशा मैत्री युक्त चित्ताने व्यापून टाकावी. त्यानंतर पश्चिम दिशा वयाप्रमाणे दाही दिशेला मैत्री भावना वाढवीत वाढवीत संपूर्ण विश्व आत्यंतिक निष्ठा अपमान वगैरे देश रहित मैत्री चित्ताने व्यापून टाकण्याचा अभ्यास करावा म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे अर्पण समाधीची पहिली ध्याने होतात.


करुणा भावना - इतरांचे दु:ख मनोमन जाणून चित्त कम्पीत होणे ही करुणा भावना होय. प्रिय व्यक्तीचे दु:ख जाणून निर्माण होणारी करुणा लोभयुक्त असते. म्हणून आपल्यावर, प्रिय व्यक्तीवर किंवा शत्रूवर करुणा भावनेचा अभ्यास आरंभ न करता प्रथम मध्यस्थ असलेल्या जिव्हाळणा-या व्यक्तीच्या दु:खावर चित्त लाऊन करुणेचा अभ्यास आरंभ करावा. तो पूर्ण झाल्यावर क्रमाक्रमाने प्रिय व्यक्तीवर, मध्यस्थावर, शत्रूवर आणि नंतर स्वतःवर करुणा भावनेचा अभ्यास करावा. शत्रूवर करुणा भावनेचा अभ्यास करताना मनात द्वेष जागृत होत असेल तर प्रथम मैत्री भावनेप्रमाणेच करुणा भावनाही सात सीमा युक्त व पाच सीमारहित अशा बारा  आकारातील एक एक आकार घेऊन तो पूर्व पश्चिम, आदी दहाही दिशांनुसार घेऊन क्रमाक्रमाने एक एक करीत वाढवीत वाढवीत संपूर्ण विश्व करुणामय चित्ताने भरुन टाकावयास पाहिजे. सध्या सुखी दिसणारी व्यक्तीही संसार चक्राच्या दु:खातच आहे असे चिंतन करुन त्यांच्याविषयी सुद्धा करुणा उत्पन्न करावी. करुणा-भावनेच्या अभ्यासानेही अर्पणा समाधीचे करुणा सहगत क्रमाने पहिली तीन ध्याने प्राप्त होतात.


मुदिता भावना - दुस-याला सुखी व आनंदी पाहून हर्षयुक्त होणे, प्रमोदित होणे ही मुदिता भावना होय. मुदिता भावनेचा अभ्यास करणा-याने प्रथम प्रिय व्यक्तीवर मुदितेचा अभ्यास आरंभ करावा, त्याला सुखी व आनंदी पाहून. हा मनुष्य किती आनंदात आहे! फारच उत्तम। फारच सुदर। " आपल्या मनात चिंतन करुन मुदिता उत्पन्न करावी. क्रमाक्रमाने मध्यस्थ व वैरी व्यक्ती बद्दलही चित्तात मुदिता उत्पन्न करावी. मुदिता भावनाही करुणा भावनेप्रमाणे वाढवीत वाढवीत न्यावी. विश्वातील सर्व प्राणीमात्रांवर मुदिता करावी. या अभ्यासानेही अर्पणा समाधीचे मुदिता सहगत प्रथम ध्यान प्राप्त होते.

उपेक्षा भावना - कोणाबद्दलही प्रेम नसणे किंवा द्वेषही नसणे ही उपेक्षा होय. उपेक्षा भावना करणाराने प्रथम मध्यस्थ व्यक्ती बद्दल उपेक्षा उत्पन्न करावी तसा अभ्यास करावा. त्यानंतर क्रमाक्रमाने प्रिय व्यक्तिबद्दल, वैरीव्यक्ती बद्दल नंतर स्वतःबद्दल उपेक्षा उत्पन्न करण्याचा अभ्यास करावा. "सर्व प्राणिमात्र आपल्या क्रमाक्रमानुसार फळे भोगीत आहे." असे त्रस्थपणे चिंतन करीत मनात संपूर्ण उपेक्षा निर्माण करावी. परंतु ही उपेक्षा जाणीवपूर्वक असावी. प्रेम व द्वेष यांचे ज्ञान नसतांही प्राणी मात्राबद्दल जर उपेक्षा केली जात असेल तर ती अज्ञानी-उपेक्षा होय. तो निष्काळजीपणा व मोह होय. उपेक्षा भावनेच्या अभ्यासाने उपेक्षा सहगत चतुर्थ ध्यान प्राप्त होते. वरील चारही ब्रह्मविहार पैकी मैत्री भावनेचे लाभ सांगताना भगवान बुद्धाने म्हटले आहे. "मैत्रीची भावना केली, ती वृद्धींगत केली, तर तो 'मनुष्य सुखाने झोपतो. झोपेतून सुखाने उठतो, वाईट स्वप्न पाहत नाही, सर्वमानवांना प्रिय होतो, अमानवांना ही प्रिय होतो. सज्जन त्याचे 'रक्षण करतात. अग्नी शस्त्राची त्याला बाधा होत नाही. त्याचे चित्त व मन एकाग्र होते. त्याचे मुख प्रकाशित राहते. मरण समयी शुद्धीवर असतो आणि अंती श्रेष्ठपद प्राप्त करतो. याप्रमाणे त्याला हे अकरा लाभ होतात. म्हणून प्रत्येक मानवाने या सृष्टीवरील सर्व सजीवांप्रती मैत्रिभावना जोपासावी म्हणजेच तथागतांनी सांगितलेले लाभ त्या प्रत्येकाला होतील. 

सर्वांचे मंगल हो!


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या