बुद्धविहारातील तरंगावर वस्तीचे भवितव्य निर्भर असते! - भन्ते अश्वजीत

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बुद्धविहारातील तरंगावर वस्तीचे भवितव्य निर्भर असते! - भन्ते अश्वजीत

कोणत्याही गावात प्रवेशिल्यानंतर बौध्दाच्या वस्तीत पाय टाकला की, प्रसन्न वाटत असेल. गाव वाटत असेल. नुसती आदर्श गावाची पाटी लावल्याने नव्हे तसेही संपूर्ण बौध्दांच्या जखमेवर मिठ चोळल्यासारखे शासनाने जाणिवपूर्वक खैरलांजीला आदर्श गाव केलेच की? तशा प्रकारचे आदर्श गाव नव्हे तर प्रत्यक्षात कृतीतील आदर्श गाव. दिसेल त्याला गावचा माणूस, मुलगा, नवयुवक आणि महिला आदराने जयभीम करीत असतील, बुद्धविहारांचा परिसर आरशासारखा लख्ख असेल. विहारातील वातावरण मंगलमय असेल. विहारात सकाळ-संध्याकळ वंदना होत असेल. विहारातून धम्मिक कार्यक्रम सतत राबविले जात असतील. विहाराच्या परिसरात कुठेही गोंधळ, कलह, मोठ्याने बोलणे आणि भांडण झगडे ऐकू येत नसतील. विहाराच्या परिसरात वयोवृध्द मंडळी समाजहिताच्या चर्चा करीत बसलेले असतील. गावातील प्रत्येकाच्या अंगी नम्रता, विनय, सौजन्य असेल तर समजून जावे की, त्या गावातील लोकांनी आपला धम्म टिकवून ठेवला आणि विहाराचे पावित्र्य राखले. बुद्ध म्हणतात, अशाच गावाची उन्नती होत असते. 









बुद्धविहारात सकाळ-संध्याकाळ वंदना म्हटल्याने बुद्धाचे नऊ गुण, धम्माचे सहा गुण आणि संघाचे नऊ गुणांचे म्हणजेच २४ गुणांचे दिवसातून दोन वेळा स्मरण होते. संगायन होते आणि त्या संगायनाने बुद्धविहारात जे तरंग बनतात ते तरंग विहाराच्या भिंती सुरक्षित ठेवतात. जगातील सर्वश्रेष्ठ असलेल्या बुद्ध, धम्म, संघाचे नियमित स्मरण होणे ही साधी गोष्ट नाही. कारण त्या तीन रत्नासारखे महान रत्न या संपूर्ण प्रथ्वीतलावर दुसरे कोणतेच नाही आणि त्याच कारणामुळे करूणा, मैत्री, मुदिता आणि उपेक्षा या चारही पवित्र भावनांचा तिथे मतत वास असतो. म्हणूनच विहारांत पाय टाकताक्षणीच आपले डोळे विलक्षण तेजाने तळपू लागतील आणि खऱ्या सामाजिक स्वातंत्र्याच्या अनुभवाने आपले हृदय स्पंदन करू लागेल. शब्दातही व्यक्त करता येणार नाही अशा आनंदाची लहर आपल्या अंत: करणात दौडत जाईल. विहारात बुद्धमूर्ती कशाचीही असली तरी तिचे एकचं बुद्धरूप असते. म्हणून बुद्धविहारातील अशा मंगलमय वातावरणाचा प्रभाव त्या गावावर पडतो, गावातील समाजावर पडतो. 




त्याचकारणाने त्या गावामध्ये सुख, शांती, समाधान आणि वैभव ओसंडून वाहत असते, याउलट जर विहाराची स्वच्छता नसेल, कधीमधी विहार उघडले जात असेल लहान मुले सतत विहाराच्या परिसरात क्रिकेट खेळत असतील, तरुण मुले टोळक्याने बसून निरर्थक? आणि अश्लील गप्पा करीत असतील, विहाराचे आसपास जोराजोरात मोबाईलची गाणी वाजत असतील, तरूण मंडळी मध्यमवर्गीय लोकांसोबत रात्रीचे प्रसंगी विहाराचे परिसरात नशापाणी करुन, बिडी सिगारेट ओढली जात असेल. गुटख्याच्या पुड्या खाऊन तिथेच पचापचा थुकल्या जात असेल, ज्यावेळी कोणी पुरूष, महिला, मुली विहारात वंदनेसाठी जात असतील, अशावेळी त्या टारगट वर्गाकडून हसत खिदळत शेरेबाजी होत असेल, महिला वर्गाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसेल मग? अशा बुद्धविहाराचे पावित्र्य कसे बरे टिकून, राहील? आणि त्याचा, असर गावावर पडून 'गावात एकी नसणे. गावात सतत कुठे ना कुंठे कलह, भांडणे, कल्लोळ, हाणामाऱ्या ऐकायला येतात. गल्लोगल्ली दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांचा त्या गावात बाराही महिने हंगाम सुरू असतो. असे चित्र दिसले की, समजून जावे त्या गावाने धम्म टिकवून न ठेवल्याने तें गाव झपाट्याने अधोगतीकडे, विनाशाकडे निघाले आहे. अशा गावाचे भवितव्य निश्चितच अंध:कारमय असते. 




बरं, त्या गावात चांगले लोक नसतात असे नाही? जे चांगले लोक वाईट प्रवृत्तीला. आळा घालण्याचा त्यांना समजावून धम्ममार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी हाताबाहेर गेलेले उध्दट तरूण त्या सज्जन लोकांना म्हणतात, आम्ही आमच्या बापाचे ऐकत नाही हे कुठले कोण?' अशा प्रवृत्तींना काय म्हणावे, हे प्रस्तुत लेख वाचणारांनीच ठरवावे. असे लोक स्वत:ही कुंशल कर्म करीत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत. अशा प्रवृत्तीचे लोक समाजासाठी धोकादायक असतात. बुद्धांचा धम्म 'कराल ते भराल अन पेराल तेच उगवेल' या तत्वावर अधिष्ठित आहे. याचा थांगपत्ता त्या लोकांना नसतो. चांगले काय, बाईट काय याचा ते कोणताच विचार करीत नसतात. फक्त आपण जे करीत आहोत तेच बरोबर आहे, असेच त्या प्रवृत्तींना बाटते. एववेच कशाला आपण कशासाठी जगत आहोत हे तरी त्यांना माहित आहे की, नाही कुणास ठाऊक? या भूमीवर तथागतांनी पाच गोष्टी दुर्लक्ष सांगितल्या आहेत. मानव योनीत जन्म होणे, ही त्यातील पहिल्या क्रमांकाची दुर्लभ गोष्ट आहे. 




या जन्मात सतत कुशलकर्म करणे, सत्कर्म करणे, चांगले कर्म करणे, योग्य कर्म करणे हेच माणसाचे मुख्य कर्तव्य आहे. असे केल्यानेच त्याचे जीवन सत्कारणी लागत असते. तथागत बुद्ध मानब जातीला माणसांचा व्यवहारिक धर्म समजावून सांगताना म्हणतात, ज्या गावाचे लोक सतत एका ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी संतत बैठका घेतात, त्याच गावाची उन्नती होते. हानी कधी होतच नाही, ज्या गावचे लोक सतत एका ठिकाणी येऊन सतत परिषदा घेऊन आपल्या गावाच्या हितासाठी, कल्याणासाठी आणि रक्षणासाठी एक नियम बनवितात, त्याच नियमाने मार्गक्रमण करतात, त्याच गावाची उन्नती होते. हानी कधी होतच नाही. ज्या गावाचे लोक आपल्या गावातील स्त्रियांचे रक्षण करतात, कोणत्याही महिलेसोबत आईबहीण समजवून वर्तणूक करतात, त्याच गावाची उन्नती होते. हानी कधी होतच नाही. ज्या गावांचे लोक आपल्या गावातील लहान मुलांवर योग्य संस्कार करतात, त्यांना धम्ममय मार्गाने जीवन जगण्याची कला शिकवितात त्याच गावाची उन्नती होते. हानी कधी होतच नाही, ज्या गावाचे लोक आपल्या गावात येणाऱ्या श्रमणांचा आदर करतात, त्यांना मानतात, त्यांना पुजतात व त्यांना दान देऊन संतुष्ट करतात, त्याच गावाची उन्नती होते. हानी कधी होतच नाही. ज्या गावाचे लोक आपला धम्म टिकवून ठेवतात, त्याच गावाची उन्नती होते, हानी कधी होतच नाही. ज्या गावाचे लोक आपल्या चैत्यांची पूजा करतात त्याचं गावाची उन्नती होते हानी कधी होतच नाही. 




समाजामध्ये चार प्रकारचे लोक असतात त्यातील एक वर्ग म्हणजे बुद्धविहारांशी आपले काही नाते नाही. आपला भिक्खूशी काही संबंध नाही, आपल्याला धम्माशी काही घेणे देणे नाही, समाज कोणत्याही दिशेला गेला तरी त्याचे आपल्याला काही सोयरसुतक नाही.विहारातील कार्यक्रमात सहभागी होऊन त्रिशरण-पंचशील ग्रहण करणे, भिक्खूचे प्रवचन ऐकणे किंवा समाजहिताच्या मुद्द्यावर सामूहिक चर्चा करणे. हे आपले काम नाही. या समाजात वावरतो म्हणून धम्मकार्यासाठी वर्गणी देणे आपले एवढेच काम आहे. कारण आपण समाजातील इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहोत. आपल्याकडे गाडी आहे, बिल्डिंग आहे, मुबलक पैसा आहे, सुख आहे आणि वैभव आपल्या पायाशी लोळण घेत आहे. आपल्याला बुद्धविहारात जाण्याची गरज नाही. आपली नोकरी भली नि आपले घर भले, पत्नी व मुलाबाळांचे लाड पुरविणे. दिवसभर ड्यूटी करणे, संध्याकाळी बिअरबारमध्ये इतरांसारखे ऐटित बसून इंग्लीश दारू पिऊन चिकनवर ताव मारणे, हेच आपल्या प्रतिष्ठेला शोभणारे काम आहे. दुसरा वर्ग म्हणजे विहारात तर येतो, धम्मकार्यातही सहभागी होतो, परंतु आचरणशून्य असतो. तो वर्ग फक्त प्रसिद्धीसाठी हपापलेला असतो. विहारात येऊनही घम्माशी बेईमानी करून देवी देवतापुढे नाक घासतो. त्याला हटकले तर, 'मी राजकारणी माणूस आहे. मला सर्वांसोबत राहावे लागते. जुळवून घ्यावे लागते. परंतु असा वर्ग आपला स्वाभिमान विकून लाचारीने जगतो. हा वर्ग समाजाच्या काही एक कामाचा नसतो. 




तिसरा वर्ग यापेक्षाही भयानक असतो. तो स्वत: तर कुशल कर्म करीत नाही, उलट जे धम्ममार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या मताचे खच्चीकरण करण्याचे महापाप ते करतात.अश्या लोकांच्या ना जगण्याला दिशा असते,ना मरणाला.असा वर्ग समाजासाठी फार धोकादायक असतो.अशा लोकांचे जीवन म्हणजे कंटलेली पतंग असते. ती पतंग कधी, कुठे आणि कशी गोते खाऊन पडेल याचा नेम नसतो. अगदी तसेच या लोकांचे जीवन असते. समाजात वावरणारा चौथ्या प्रकारचा वर्ग खरा इमानदार असतो. बुद्धविहारात दररोज वंदना झाली पाहिजे. समाज एकजूट असला पाहिजे. अन् तो धम्ममार्गावर आरूढ असला पाहिजे. लहान लेकरांवर धम्माचे योग्य संस्कार झाले पाहिजेत, बुद्धविहारातून प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले गेले पाहिजेत. बुद्धविहाराचे पावित्र्य अबाधित राहिले पाहिजे. विशेष म्हणजे असा वर्ग निर्व्यसनी असतो. आपल्याप्रमाणे आपले धम्मबांधव धम्ममार्गावर आले पाहिजे यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. कारण ते जाणतात की, विहारातील शुद्ध- परिशुध्द तरंगावर त्या वस्तीचे, त्या गावाचे, त्या गावात राहणाऱ्या माणसांचे भवितव्य अवलंबून असते. अशा प्रकारच्या वर्गाला मंगल कामना! आणि जगातील सर्वश्रेष्ठ बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न त्यांना अधिकाअधिक प्रेरणा देऊन त्यांना सक्षम बनवो! 


सर्वांचे मंगल हो!


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७






बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या