विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव बौद्धांनी ११ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करावा.
१) आपल्या लेकीबाळीना बौद्धांनी १० एप्रिल पासूनच आपल्या घरी बोलवावे.
२) नवीन कपडे शिवणे, घरांमध्ये काही वस्तू आणणे, नवीन गाडी खरेदी करणे, घराची रंगरंगोटी करणे बौद्धांनी याच कालावधीत करावे.
३) १० एप्रिल रोजी सर्वांनी मिळून आपली वस्ती,बुद्धविहार आणि विहाराचा परिसर तसेच आपापली घरे सुद्धा झाडून पुसून लख्ख करावी.
४) नवीन कपडे खरेदी करताना शक्यतोवर शुभ्र वस्त्रच खरेदी करावेत.
५) ११ एप्रिल रोजी पहाटे बुद्धविहाराच्या लाऊडस्पीकरवर बुद्धवंदना लावून फक्त बुद्ध-भीम गीतेच वाजवावी.इतर जाती धर्माची मने दुखावतील अशी गाणी वाजवू नये. त्यानंतर सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान बुद्धविहाराचे परिसरात नवीन धम्मध्वज फडकवावा.
६) सकाळी ९ वाजता सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून सामुदायिक वंदना घ्यावी.त्यानंतर सर्वांनी आपल्या घरी जावे.
हे ही वाचा... || डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करणे म्हणजे जयंती साजरी करणे नव्हे!
७) घरची कामे आटपून सर्वांनी बारा वाजता पुन्हा बुद्धविहारात जमा व्हावे.ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित गावातील विद्यार्थी वर्गांची भाषण स्पर्धा घ्यावी.त्यासाठी विद्यार्थी वर्गाला आतापासूनच तयार करावे. त्या भाषणातून परीक्षकांनी तीन उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करावी. ही स्पर्धा दुपारपर्यंत चालवावी.
८) संध्याकाळी ७ वाजता ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर चांगले बोलणारास पाचारण करून त्याच्या प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवावा. आणि त्याचे भाषण सर्वांनी मन लावून ऐकावे. तश्या वक्त्याचा आतापासूनच शोध घ्यावा व त्याला निमंत्रित करावे शक्य झाल्यास कार्यक्रमानंतर खिरदान करावे.
९) १२ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान सर्वांनी विहारात जमून सामुदायिक वंदना घ्यावी.
१०) दुपारी बारा वाजता सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थी-विद्यार्थिनींची आणि महिला वर्गाची भाषण स्पर्धा ठेवावी. यातसुद्धा तीन उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करावी.
११) संध्याकाळी ७ वाजता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी एखादा वक्ता बोलवावा. व त्या वक्त्याचे भाषण सर्वांनी ऐकावे.
१२) १३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान सामुदायिक वंदना घ्यावी.
हे ही वाचा... || डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करणे म्हणजे जयंती साजरी करणे नव्हे!
१३) बारा वाजता माता रमाई यांच्या जीवनावर आधारित भाषण स्पर्धा आयोजित करावी. त्यातील तीन उत्कृष्ट स्पर्धक निवडावे.
१४) संध्याकाळी ७ वाजता माता रमाई यांच्या जीवनावर चांगल्या पद्धतीने बोलणाऱ्या वक्त्याला बोलावून त्याचे प्रबोधन शांतचित्ताने ऐकावे.
१५) १४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ९ या वेळात सामुदायिक वंदना घ्यावी.
१६) बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्रावर आधारित विध्यार्थ्याची वकृत्व स्पर्धा घ्यावी. त्यात सुद्धा परीक्षकांनी तीन उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करावी.
१७) सध्या लाकदावूनचे दिवस आहेत.जर शासनाची परवानगी मिळाली तर शासनाचे नियम पाळून आपल्याच गावातून, आपल्याच वस्तीतून किंवा आपल्याच मोहल्ल्यातुन संध्याकाळी ४ वाजता ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढावी.या मिरवणुकीमध्ये डी.जे. अजिबात नसावा म्हणजेच मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे या वाईट पद्धतीला आळा बसेल.
१८) निवडणुकीत बौद्धांनी शुभ्र वस्त्र परिधान करून शिस्तीने दोन-दोनच्या रांगेत मंगल मैत्री म्हणत चालावे. आणि अधूनमधून जयघोष करावा.
हे ही वाचा... || डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करणे म्हणजे जयंती साजरी करणे नव्हे!
१९) घोषणा फक्त खालील प्रमाणे असाव्यात.
अ) महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध की करुणा होवो SSS करुणा होवो SSS करुणा होवो SSS ( कारण आपण तथागत बुद्धांचा जय-जयकार करू शकत नाही. कारण ते जय आणि पराज्याच्या पलीकडे गेलेले आहेत.)
ब) परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो!
क) भिक्खु संघाचा विजय असो!ड) धम्मध्वजाचा विजय असो! इ) महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो!
ई) सावित्रीबाई फुले यांचा विजय असो!
उ) त्यागमूर्ती रमाबाईचा विजय असो!
२०) अशा प्रकारच्या घोषणा करीत आणि मंगल मैत्री करीत. तसेच महिलांनी पाळणा गीते म्हणत शांतता रॅली बरोबर सहा वाजता संपवावी.
२१) मिरवणुकीदरम्यान ज्यांनी ज्यांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या त्यांचे सुद्धा परीक्षण करावे.आणि त्यातील तीन उत्कृष्ट अशा रांगोळ्यांची निवड करावी.
२२) संध्याकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती चांगल्या प्रभावीपणे सांगणाऱ्या एखाद्या वक्त्याला बोलावून त्याच्या प्रबोधनाचा कार्यक्रम सर्वांनी मन लावून श्रवण करावा.
२३) त्यानंतर दिनांक ११ एप्रिल पासून घेतलेल्या वकृत्व स्पर्धेचे बक्षीस,रांगोळी स्पर्धेचे बक्षीस, वितरण करून कार्यक्रम संपवावा.
२४) सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर खिरदान करावी. शक्य असेल तर गावाच्या वतीने गावकऱ्यांसाठी सामुदायिक भोजन ठेवावे.
२५) त्यानंतर काही वेळासाठी बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम ठेवून कार्यक्रमाची यशस्वी सांगता करावी.
हे ही वाचा... || डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करणे म्हणजे जयंती साजरी करणे नव्हे!
अशा पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन केल्यास १४ एप्रिल साजरी करण्याची नवी आणि योग्य पद्धत आपल्या गावात सुरू होईल. आणि आपल्या आजूबाजूच्या गावात सुद्धा आपल्या गावच्या कार्यक्रमाविषयी चर्चा होऊन पुढील वर्षी ते सुद्धा आपले अनुकरण करण्यासाठी आपोआप तयार होतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी.जे. आणि नाचने नसल्याने रॅलीला एक वेगळे स्वरूप येईल.आणि आपल्या गावात एक नवा पायंडा पडेल. सतत चार दिवस गावात मंगलमय वातावरणाची निर्मिती होईल त्यात प्रत्येकाच्या घरावर फडकणारा धम्मध्वज अधिक उत्साह भरेल. सतत चार दिवस बुद्धविहाराचे लाऊडस्पीकर बुद्ध - वंदना आणि बुद्ध -भीम गीते वाजत राहिल्याने गावाचे वातावरण धम्म्मय दिसेल गावात येणाऱ्या नवीन पाहुण्याला १४ एप्रिल साजरी करण्याची योग्य पद्धत भुरळ पाडेल.
आणि खास महत्वाची बाब म्हणजे इतर जाती-धर्माच्या लोकांमध्ये अशा कार्यक्रमांमुळे एक वेगळा प्रभाव पडेल. कारण यापूर्वी त्यांनी बौद्धांच्या १४ एप्रिलच्या धांगडधिंगा असलेल्या मिरवणुकीचा अनुभव घेतलेला आहे. अशा प्रकारच्या मिरवणुकीमुळे त्यांचे मनामध्ये एक आदराची भावना निर्माण होईल. त्यासाठी बौद्धांना काही महत्त्वपूर्ण कामे करावी लागतील. त्यापैकी सर्वात महत्वाचे काम म्हणजे माणसामाणसातील दुराव्याची दरी मैत्री भावनेने बुजवावी लागेल.गैरसमजाने समाजमनाच्या टीचरलेल्या भिंती समोपचाराच्या लेपाने लिपाव्या लागतील. क्षुल्लक कारणाच्या मतभेदांमुळे समाजापासून दुरावलेल्या माणूस माणसाची जोडावा लागेल. प्रत्येक बौद्धाने आपल्या मनातील 'मी'पणा आणि अहंकार बाजूला सारला पाहिजे. राग, द्वेष, लोभ, मोह आणि मत्सर हे माणसाचे असलेले भयानक शत्रू बौद्धांनी आपल्या अंत:करणातुन हद्दपार केले पाहिजे. आणि सर्वांनी एका ठिकाणी येऊन एकतेचे दर्शन घडविले पाहिजे. तसेच सर्वांनी एका ठिकाणी येऊन एकमताचा निर्णय घेऊन त्याची प्रत्येकाने आपल्या पासून अंमलबजावणी केली पाहिजे. मगच गुरू-शिष्य जयंती सोहळा आनंदाने हसेल, आणि माणसांची वस्ती सुद्धा माणुसकीला शोभून दिसेल!
भन्ते अश्वजित
सदधम्म बुद्धविहार, आरती
नगर, औरंगाबाद
मो. नं:- ९६७३२९२२९७
बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !
संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन
0 टिप्पण्या